file photo
file photo 
नांदेड

गुलाल तर आमचाच उधळणार, पॅनलप्रमुखांचा दावा- अर्धापूरात मतमोजणीची तयारी पूर्ण

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील 37 गावपुढारी कोण असणार हे सोमवारी (ता. 18) ठरणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली. ही मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरु होणार असून चार फेरीत मतमोजणी पूर्ण होईल अशी माहिती तहसील प्रशासनाने दिली. गावपुढा-यांची उत्सुकता शिगेला पोंहचली आहे. गाव विकासाच्या चाब्या आपल्याच हाती राहाव्यायासाठी सर्वच पॅनलप्रमुखांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती.

अर्धापूर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान घेण्यात आले होते. तालुक्यातील 130 मतदान केंद्रावर 65 हजार मतदारापैकी सुमारे 83 टक्के मतदारांनी मतदानचा हक्क बजवला आहे. तर सहा ग्रामपंचायची निवडणुक बिनविरोध झाल्या आहेत.

तहसील कार्यालय सभागृहात सकाळी दहा वाजता मत मोजणीला प्रारंभ होणार असून चार फेरीत मतमोजणी पूर्ण होईल. मत मोजणीला बारा टेबलवर मतमोजणी होईल. एका फेरीत बारा ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल ही मतमोजणी दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

धुरळा कोणाचा उडणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असले तरी गावोगावी विजयाची तयारी सुरु झाली आहे. गुलाल, फटाके, मिठाई,मिरवणुक आदींची तयारी सुरू आहे. तर यंदा काही गावात धक्कादायक निकाल येवून प्रस्थापितांना पराभवाला सामोरे जावे लागेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच मतदारांनी परिवर्तनाला कौल दिला की जुण्यांना पुन्हा संधी दिली हे मतमोजणी नंतर स्पष्ट होईल.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT