Workers sakal
नांदेड

Hanegav News : ना हाताला काम...ना शासनाचे अनुदान...; दुष्काळ जाहीर करूनही मिळेनात शासनाच्या योजना

जुन ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील २५ मंडळात राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

हाणेगाव - देगलूर तालुक्यातील हाणेगाव मंडळात राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आले, मात्र दुष्काळ परिस्थितीत सुध्दा ‘ना हाताला काम ना शासनाचे अनुदान’ यामुळे मजुरकार वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जुन ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील २५ मंडळात राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आले. यामध्ये देगलूर तालुक्यातील हाणेगाव मंडळाचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत या भागातील मजुरकार, कामगार व गोर गरीब जनतेच्या हाताला काम मिळत नाही. शासन योजनेचे सुद्धा काही लाभ मिळत नाही. या मुळे पोटाची खळगी भरण्यासाठी ठिकठिकाणी भटकंती करावी लागत आहे.

मंजुर झालेला पिकविमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. स्वस्त धान्य योजनेतून शेतकऱ्यांचे नाव कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आयुष्मान कार्ड मिळत नाही. शासनाने देगलूर तालुक्यातील हाणेगाव मंडळ दुष्काळ जाहीर केले मात्र दुष्काळी परिस्थितीत सुध्दा शासन योजनेचा फायदा मिळत नाही. याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून शासन योजनेचा फायदा कधी मिळणार अशी चिंता या भागातील नागरिकांत पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT