File photo 
नांदेड

स्कूल बस-व्हॅन झाल्या हत्ती पोसायचे साधन, शाळा पुन्हा बंद झाल्याचा परिणाम

प्रमोद चौधरी

नांदेड ः कोरोनाचा संसर्ग मध्यंतरी काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. दरम्यान, स्कूल बसेस तसेच व्हॅन सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे शाळा बंद झाल्यात. त्यामुळे फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या चिंतेने चालक-मालक हैराण झालेले आहेत. 

काही दिवसात अधिकृतपणे स्कूलबस सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि शाळा बंद करण्यात आल्या. पर्यायाने स्कूल बस सुरू होण्याची शक्यता पुन्हा मावळली आहे. स्कूल बसेस, व्हॅन बंद असल्याने चालक मालक आणि विद्यार्थ्यांची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या सहायकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. अनेक जण भाजीपाल्यासह विविध व्यवसाय, धंदा करून कसाबसा आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. शाळा बंद असल्याने राज्य शासनाने स्कुलबससाठी कर्जात सूट दिली होती ती मुदत आता संपली आहे. 

बँका आणि वित्त संस्थांचे हप्तेही सुरू आहेत. त्याचप्रमाणे विम्याबाबत कोणतीही सवलत मिळाली नाही. व्यवसाय बंद असल्याने स्कूल बस चालकांच्या डोक्यावर अप्रत्यक्ष कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. आवक बंद असल्याने कर्ज फेड करायची कशी? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. शाळा, शिकवणी वर्ग, महाविद्यालये बंद असल्यामुळे गत १२ महिन्यांपासून स्कूलबस, व्हॅन, मॅजिक, अॅटो यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे पर्यायी उत्पन्न नाही. त्यामुळे बॅंक, फायनान्स कंपन्यांचे कर्जाचे हप्ते थकणे स्वाभाविकच आहेत. त्यामुळे शासनाने सकारात्मक भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शासनाकडून जीवनावश्यक कीटही दिली नाही 
फायनान्स कंपन्यांचे एजंट गुंड लोकांना पाठवून धमक्या देत आहेत. त्यांना वेळीच पायबंद घालावा. अन्यथा स्कूलबस व्हॅनचे चालक मालकांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. अद्यापपर्यंत स्कूलबस व्हॅनचे चालक मालक यांना शासनाने कुठलीही मदत केलेली नाही. जीवनावश्यक कीट देखील दिली नसल्याची खंत स्कूल व्हॅन, बस चालक मालकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

हप्ते भरण्यास सवलत मिळावी
स्कूल व्हॅन चालकांना फायनान्स कंपनी कर्ज देते ते शाळेच्या करारनामा लेटर व स्कूलबस पाहूनच. त्यामुळे शाळा व्यवस्थित सुरु असेलतरच कर्जाची परतफेड करणे सोयीचे होते. अन्यथा इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने मदत द्यावी, किंवा हप्ते भरण्यासाठी सवलत द्यावी. 
- निखिल लातूरकर, संस्थापक अध्यक्ष, नांदेड जिल्हा स्कूल बस व्हॅन-मॅजिक-अॅटो संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT