लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.jpg
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.jpg 
नांदेड

दर महिन्याला पंचवीस हजार द्या म्हणाला आणि.....

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : वाळूचे टिप्पर चालू देण्यासाठी दर महिन्याला पंचवीस हजाराची मागणी करणारा ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथील तलाठ्यासह त्याला मदत करणारे दोन खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडल्याची घटना सोमवारी (ता. ११) पंचासमक्ष सिद्ध झाली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूचे टिप्परसाठी पंचवीस हजाराची मागणी
नांदेड शहराजवळील ब्राह्मणवाडा या ठिकाणी कार्यरत असलेले तलाठी माधव बोधगिरे याने एकाला वाळूचे टिप्पर चालवण्यासाठी व टिप्परवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी केल्याची तक्रार फिर्यादीने सोमवारी (ता. ११) नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. 

पंचासमक्ष झाली पडताळणी
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडून सोमवारी (ता. ११) रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये लोकसेवक तलाठी माणिक बोधगिरे याने तक्रारदाराकडून वाळू उपशाच्या कारणासाठी पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी करून ती मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर दोन व्यक्तीने तक्रारदार व लोकसेवक तलाठी यांच्यात मध्यस्थी करून लोकसेवकास लाच मागण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले.

नांदेड ग्रामिण पोसिल ठाण्यात गुन्हा
याप्रकरणी आरोपी लोकसेवक तलाठी माणिक बोधगिरे यांच्यासह इतर दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी करीत आहेत. 

एसीबी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाइ
पडताळणीचा सापळा लावण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी, पोलिस जमादार संतोष शेटे, पोलीस नाईक दर्शन यादव, एकनाथ गंगातीर्थ, नरेंद्र घोडके यांनी पार पडली. 

भ्रष्टाचाराबाबत नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवकांचे संदेश किंवा व्हिडिओ- ऑडिओ क्लिप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला
विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात प्रसुतीगृहाजवळ सुरक्षेचे काम करणाऱ्या रक्षकाने प्रसुतीगृहात का जाऊ दिले नाही या कारणावरुन अज्ञात व्यक्तीने समुहाच्या मदतीने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना बुधवारी (ता. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

प्रसुतीगृहात का सोडले नाही म्हणुन हल्ला
विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलचे सुरक्षा रक्षक दिलीप पोतसिंग गायकवाड हा प्रसुतीगृहासमोर सुरक्षेचे काम करतो. ता. दोन मे रोजी प्रसुतीसाठी आलेल्या एका महिलेच्या नातेवाइकांना आत का सोडले या कारणावरुन बुधवारी (ता. १४) काही मंडळीनी विष्णुपुरी येथील एसबीआय बॅंकेच्या एटीएम समोर अडविले. यावेळी प्रसुतीगृहात का सोडले नाही, म्हणून रस्त्यावर आडवे पाडून तलवार, काठी व हॉकीस्टीकने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी दिलीप गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र सांगळे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT