File photo 
नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना सुधारित योजनेचा लाभ मिळणार

प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागातील सेवा निवृत्त व कार्यरत ४७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना २०१६ पासून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला, दुसरा व तिसरा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी कळविले आहे.

आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ या संवर्गात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पहिला, दुसरा व तिसरा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतर्फे २०१९-२० या वर्षामध्ये आॅक्टोबर २०१९ अखेरपर्यंत एकूण १५९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. 

पैकी काही प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे प्रस्तावाती त्रुटींची पुर्तता डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण करून परिपूर्ण प्रस्ताव वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून मागविण्यात आला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी संचिका सादर केली. त्यामध्ये अध्यक्ष, पदोन्नती समिती यांच्याकडून मार्च व एप्रिल २०२० या महिन्यात सभा घेण्याबाबत मान्यता मिळाली. त्यानुषंगाने सभेतील मान्यता व त्यायोगे प्रशासकीय बाबींची पुर्तता होऊन जून २०२० मध्ये आरोग्य सहाय्यक (पुरुष) ४४, आरोग्य सेवक (पुरुष) २३, आरोग्य सेविका आठ, आरोग्य सहाय्यिका २९, औषध निर्माण अधिकारी २२, आरोग्य पर्यवेक्षक विस्तार २१ व प्रयोगशाळा तंत्रज्ञ १२ असे एकूण १५९ कर्मचाऱ्यांचे सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

तसेच सप्टेंबर २०२० अखेर सर्व संवर्गाचे एकूण ३१५ प्रस्ताव प्राप्त झाले. आरोग्य विभागातील सर्व शाखांनी सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी सप्टेंबर २०२० मध्ये मान्यता मिळाली. आरोग्य सेविका - २१२, आरोग्य सेवक-१२, आरोग्य सहाय्यक-३९, आरोग्य सहाय्यिका-३६, कुष्ठरोग तंत्रज्ञ-१६ असे एकूण ३१५ कर्मचाऱ्यांचे सुधारित आश्वासित प्रगी योजनेचा लाभ देण्याबाबत मंजुरी मिळालेली आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एकूण ४७४ कर्मचाऱ्यांना आॅक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२१ पर्यंत १६ महिण्यांचे कालावधीत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करण्यात आला आहे. 
- डॉ. बालाजी शिंदे, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT