Nanded Weather  sakal
नांदेड

Nanded Weather : नांदेड शहरामध्ये जोरदार पाऊस

Nanded Weather : नांदेड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पाऊस सखल भागात पाणी साचले. वीज पडून एक महिला ठार, दोघी गंभीर जखमी झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास परतीच्या पावसाने सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावली. रस्त्यांसह सखल भागांत पाणी साचले.

त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे शहरवासी‍यांची उकड्यापासून काही काळ सुटका झाली तर, ग्रामीण भागात मात्र, सोयाबीन काढणीत व्यत्यय ठरला आहे.

नांदेड जिल्ह्यात अपेक्षित पाऊस ८३४ मिलिमीटर असून प्रत्यक्षात ८७७.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी १०५.१९ इतकी आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात ११ ऑक्टोबरपर्यंत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हिंगोली शहर व परिसरात दुपारी दोनच्या सुमारास मेघगर्जनेसह तुरळक पाऊस झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते.

वीज पडून महिला ठार

कंधार तालुक्यातील काही भागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. वीज पडून महिला ठार तर दोघी गंभीर जखमी झाल्याची घटना मसलगा (ता.कंधार) येथे दुपारी घडली. अनसूयाबाई व्यंकट बोईनवाड असे मृताचे नाव आहे. हनुमानबाई नागोराव बोईनवाड व सुमनबाई चिमणाजी बोईनवाड या गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

माहूर, कर्णपुरा यात्रेत तारांबळ

छत्रपती सभाजीनगर शहराच्या काही भागात दुपारी चार-साडेचारच्या सुमारास तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नवरात्रोत्सवामिमित्त कर्णपुरा यत्रा सुरू असून या भागात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मोठी गर्दी असलेल्या या यात्रेत पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाला. काही विक्रेत्यांचे स्टॉल पाण्यात गेले. दरम्यान, माहूर (जि. नांदेड) येथीही दुपारी दमदार पाऊस झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली. आरोग्य विभागाच्या औषधांवर पाणी पडल्याने नुकसान झाले. भाविकांना चिखलमय पाण्यातून परतीचा प्रवास करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रेमभंग म्हणजे धोका नाही; सहमतीने संबंधानंतर लग्नास नकार दिल्यास तो बलात्कार ठरत नाही, फसवणुकीची खरी व्याख्या HC ने सांगितली!

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

SCROLL FOR NEXT