Heavy rains have damaged Kharif crops in Shivani area of ​​Kinwat taluka 
नांदेड

शिवणी परिसरात अतिवृष्टीने खरिपातील पिकाचे झाले मातेरे; शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

विठ्ठल लिंगपूजे

शिवणी (ता. किनवट) : खरीप हंगामातील पिकावरच दसरा-दिवाळी या सणाच्या खर्चासह रब्बीची पेरणीवर अवलंबून असते. खरिपातील पिकावर अतिवृष्टीच्या पावसाचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सोयाबीन सह कापूस पीक वाया गेले असून यामुळे आता शेतकऱ्यांना रब्बीतील पिकाच्या उताऱ्यावर सर्व काही भिस्त अवलंबून असल्याचे वास्तव दिसत आहे.

या वर्षी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍याचे खरिपातील पेरणीस उरकली होती. यातच काही सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी भेसळयुक्त बियाणी दिल्याने शेतकऱ्यांना दुपार व तिबार पेरणी करावी लागली होती, असे असतानाही ती चांगली बहरले असतानाच काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाने सतत हजेरी लावून या पिकाची पुरती वाट लावली.

काढणी अभावी पिक शेतात तसेच कोमेजल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे.  यातच आता तोंडावर आलेली रब्बीची पेरणी कशाच्या बळावर करावी याची चिंता बळीराजाला सतावत असल्याचे दिसत आहे. यातूनच कसेबसे सावरत सोयाबीनची काढणी करत शेतकरी रब्बी हंगामातील पीकाची पेरणी करण्याकरता शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. 

शेतकऱ्यावर आलेले संकट पाहता तसेच दुष्काळाची गडद छाया असताना शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली. यातूनच कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांची आधार लिंक करण्याचे काम सुरू केले, पण यातही अनेक शेतकरी वंचित राहिले असल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना याला कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याने ही योजना केवळ कागदपत्रे असल्याची चर्चा होत आहे. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे परतीच्या पावसाने सोयाबीन पीक शेतकर्‍याच्या हातचे गेले आहे. 

जे काही पिक निघत आहे, त्याला तीन ते चार क्विंटलचा उतारा येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व नुकसान भरून काढण्यासाठी कापूस पिकावर सर्वांचे लक्ष लागले होते, पण या पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा शिरकाव झाल्याने हे पीक हातचे गेले आहे. सोयाबीन हे पीक अतिवृष्टीने हातचे गेले असताना कापसावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक गणित कोलमडले असून शेतकरी दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. यामुळे सर्वात मोठा असलेला दिवाळी सण कसा साजरा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. शासनाने मदतीची घोषणा केली असली तरी नेमकी ही मदत किती मिळणार ते जाहीर झाली नसून दिवाळीच्या अगोदर ही मदत मिळते की नाही, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT