nanded police sakal
नांदेड

नांदेड शहरात शुक्रवारपासून ‘हेल्मेट सक्ती’

शुक्रवारपासून विना हेलमेट दिसणाऱ्या दुचाकीस्वारास कडक शासन

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पुढील महिण्यात (ता.एक) एप्रील पासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. त्यापुर्वी बुधवारी (ता.३०) परिवहन विभागाच्या वतीने शहरातील विविध चौकात हेल्मेट घालून गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र २० ते २५ मिनिटे थांबुन देखील हेल्मेट घातलेला दुचाकीस्वार सापडत नव्हता. त्यामुळे अधिकारी चांगलेच घामाघुम झाले होते. आर्ध्यातासानंतर एक दुचाकीस्वार सापडल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते त्या दुचाकीस्वाराचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

तसे बघितले तर वाहन चावताना रस्त्यात अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत होऊ नये यासाठी दुचाकी चालवताना डोक्यावर हेल्मेट असणे गरजेचे असते. मात्र अनेकजण स्वतःच्या सुरक्षेकडेच जाणिवपूर्वक दूर्लक्ष करतात. विशेष म्हणजे मागील काही वर्षापासून नवीन दुचाकी खरेदी सोबतच हेल्मेट दिले जाते. नवीन गाडी सोबत आलेले हेल्मेट एकदा घरी आल्यानंतर पुन्हा कधीच घराबाहेर काढले जात नाही. त्यामुळे घरातील हेल्मेटची प्रत्येकास सवय लागावी व रस्त्यावर होणाऱ्या आपघातामध्ये कुणालाही जिव गमवावा लागूनये यासाठी परिवहन विभाग व जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत ता.

एक एप्रिल पासून जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबतच दुचाकी चालविणाऱ्या सामान्य नागरीकांना देखील हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी लेखी आदेश काढले असून परिवहन कायद्यानुसार रस्त्यावर दुचाकी चालविणाऱ्या प्रत्येकास हेल्मेट परिधान करणे आवश्यक असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपयांचा दंड आणि तीन महिण्यासाठी लायसन्स रद्द करण्यात येणार आहे.

मोहिम किती काळ सुरु राहणार

शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांना देखील हेल्मेट सक्ती असणार आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करु देऊ नये व त्यांच्यावर नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या पुढे सामान्य नागरीक असो किंवा शासकीय आधिकारी - कर्मचारी यांना हेल्मेट घालून घराबाहेर निघावे लागणार आहे. जिल्हाधिकारी व परिवहन विभागाकडून सुरु करण्यात आलेली हेल्मेट सक्तीची मोहिम किती काळ सुरु राहणार हे येत्या काळात दिसून येणारच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT