file photo 
नांदेड

शिवसैनिकांना न्याय मिळवून देणार- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील शिवसैनिकांना येणाऱ्या काळात नक्कीच न्याय देऊ, तसेच विविध शासकिय व अशासकिय समितीवर घेऊन त्यांच्यामार्फत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवारी (ता. १२) नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता सायंकाळी जिल्हा शिवसैनिकांची बैठक घेऊन यांनी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या एका बैठकीत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवारी (ता. १३) होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उदय सामंत नांदेड दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद पाटील तिडके, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, सुभाष साबणे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, शहरप्रमुख सचिन किसवे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, आपण सरकारमध्ये आहोत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने आपल्याला सत्तेत योग्य वाटा मिळेल. शासकीय समितीवरील नियुक्ती तसेच इतर प्रश्नांच्या बाबतीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करुन शिवसैनिकांना न्याय मिळवून देईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. माझ्या तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांशी संबंधित काही प्रश्न असतील ते देखील सोडविण्यासाठी मी प्रयत्न करील असे त्यांनी सांगितले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे तसेच श्री गुरुगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालक मंडळावर भाजपचे आमदार राजेश पवार यांची नियुक्ती मागील सरकारच्या काळात झाली होती. त्यावेळी तेथे शिवसेनेशी संबंधित लोकांची नियुक्ती करावी अशी मागणी सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी त्यांच्याकडे केली. त्यावर या दोन्ही मागण्या मान्य करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी त्यांना आश्वासीत केले. या बैठकीला प्रदीप उर्फ पप्पू जाधव, माधव पावडे, महेश खेडकर, लखन साबणे, जयवंत कदम, अशोक उमरेकर, महेश पाटील देगलूरकर यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT