In Hingoli taluka, a case has been registered against six persons for smuggling sand.jpg 
नांदेड

अवैध वाळूची चोरटी विक्री करणारे ट्रँकर पकडून १७ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

राजेश दरव्हेकर

हिंगोली :  तालुक्यातील खानापूर चित्ता ते अंभेरी मार्गावर अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रँक्टर पकडून १७ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. ३१ ) सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील खानापूर चित्ता ते अंभेरी जाणाऱ्या मार्गावर अवैध वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आज सकाळी पाच वाजता या मार्गावर छापा मारला असता ट्रँक्टरच्या तीन ट्राँलीतून वाळुची विना परवाना चोरटी वाहतूक करीत असलेल्या या वाहनात पाच ब्रास वाळू आढळून आली. 

यामुळे ही वाहतूक करणारे चालक जनार्दन गंगावणे (रा. खेड), विश्वदीप पाईकराव (रा. टाकळी), गजानन गंगावणे (रा. खेड) तसेच मालक प्रकाश कांदे, आकाश कांदे, विष्णू कांदे तीघे (रा.खेड) यांच्या सांगण्यावरून स्वतः च्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या वाळूची चोरटी वाहतूक करतांना आढळून आल्याने या सहा जणाविरुध्द बासंबा पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल करून तीन ट्रँक्टर हेड व ट्राँलीसह १७ लाख २५ हजार व १५ हजार रुपये किमंतीची पाच ब्रास वाळू असा एकूण १७ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे कर्मचारी विलास सोनवणे, सुदाम लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, राजुसिंग ठाकुर, सुनील अंभोरे, दिपक पाटील, आकाश टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT