नांदेड - ठाकूर - चौहान कुटुंबियांनी साध्या पद्धतीने लग्न करुन कोरोना योद्धांचा सन्मान केला. 
नांदेड

साध्या पद्धतीने लग्न करुन कोरोना योद्धांचा सन्मान

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना आणि लॉकडाउनमुळे लग्न सोहळ्यावर बंदी असून मोजक्याच पन्नास पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व नियम, अटी व शर्थी पाळून विवाह सोहळा झाला. एवढेच नाही तर विवाह सोहळा साध्या पद्धतीने करुन त्यात बचत करुन जमा झालेल्या पैशातून कोरोना योद्ध्यांचा संरक्षक किट आणि साडीचोळी व सफारीचे कापड देऊन सन्मान करण्यात आला. 

कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे लग्न तसेच इतर सण, धार्मिक सोहळे आदींवर गर्दी होत असल्यामुळे बंधने घालून बंद ठेवण्यात आले होते. तब्बल दोन महिन्यानंतर आता हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. त्यानुसार आता मंगल कार्यालयांसह इतर ठिकाणी लग्न सोहळ्यास नियम व अटींच्या शर्थी घालून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लग्न सोहळ्यासाठी फक्त ५० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार लग्नसोहळे पार पडत आहेत.  
   
हेही वाचा - सार्वजनिक जीवनमान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच...

ठाकूर - चौहान विवाह सोहळा
कोणताही बडेजाव न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न लावून ठाकूर व चौहान परिवाराने झालेल्या बचतीमधून सफाई कामगारांना सफारीचे कापड व साडी चोळीच्या आहेरासोबत मास्क, हातमोजे व सॅनिटायजर देऊन आगळ्यावेगळ्या पध्दतीने कोरोना योद्धांचा सम्मान केला. हा विवाह सोहळा नांदेड शहरातील गाडीपुरा भागात गुरूवारी (ता. ११) पार पडला. 

ॲड. दिलीप ठाकूर यांचा पुढाकार
नांदेड येथील एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी अमरसिंह ठाकूर यांचा मुलगा अभिजित व लिंबा (तालुका पाथरी, जिल्हा परभणी) येथील योगेश्‍वरी शुगर मीलचे सुपरवायझर प्रकाशसिंह चौहान यांची मुलगी श्वेता यांचा विवाह तीन महिन्यापूर्वी ठरला होता. पण कोरोना आणि लॉकडाउनमुळे त्याची तारिख लांबणीवर पडत गेली. शेवटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह अतिशय साध्या पद्धतीने पार पडावा, यासाठी मुलाचे काका भाजपाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर यांनी पुढाकार घेतला. वधूपिता व वरपिता यांचे समुपदेशन केले. 

पन्नास जणांच्या उपस्थितीत सोहळा
दोन्ही बाजूंच्या मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील गाडीपूरा येथील ठाकूर यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह झाला. विशेष म्हणजे पुरोहितापासून वधूवरापर्यंत सर्वांनी मास्क परिधान केले होते. यावेळी ॲड. ठाकूर यांच्यासह माजी नगरसेविका जयश्री ठाकूर, सिडको भूषण करणसिंग ठाकूर, समीर चौहान, डॉ. सतीश चौहान, दिपकसिंह चौहान, विजयसिंह ठाकूर, सन्नीसिंघ जालनावाले, जग्गनाथसिंह चौहान, शंकरसिंह ठाकूर आदी उपस्थित होते. 

कोरोना योद्धांचा सन्मान
लग्न म्हटले की मानपान, आहेर यांची रेलचेल असते. पण या सर्व रितीरिवाजाला फाटा देण्यात आला. त्यामुळे मोठी बचत झाली. कोरोनाच्या लढाईत ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अतिशय कष्ट घेतले, काम केले अशा सफाई कामगारांचा संरक्षक वस्तू देऊन नववधू वराने सत्कार केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात एक महिला व एक पुरुष कामगाराचा सन्मान करण्यात आला. संरक्षक किटमध्ये मास्क, सॅनीटायझर, फेसमास्क, हॅण्डग्लोज तसेच सफारी कापड आणि साडीचोळीचा समावेश आहे. असे जवळपास शंभर किट वाटण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांना घरपोच देण्यात आले. सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुणेमंडळींनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

SCROLL FOR NEXT