file photo 
नांदेड

कशी नशिबाने थट्टा मांडली : लाॅकडाउनच्या वाढत्या भीतीने परप्रांतीय मजूर परतीच्या मार्गावर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ता. 25 मार्च ते ता. चार एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. गतवर्षी देखील काही दिवसांसाठी लावलेला लाॅकडाऊन अनेक महिने वाढल्याचा अनुभव लक्षात घेता दुसऱ्यांदा लावण्यात आलेला लाॅकडाऊन देखील वाढण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान राज्यातील मजूर गावी परतण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावर गर्दी करत आहेत. रेल्वे व अन्य मार्गाने आपले गाव जवळ करत असल्याने कशी नशिबाने थट्टा आज मांडली म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर रोजगारासाठी दाखल झालेला आहे. काही जण भेळ पाणीपुरीचा व्यवसाय करतात, राजस्थान राज्यातील फरशी बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणात करणारा देखील मंजूर आहे. तसेच सराफा कारागीरसुद्धआ याच भागातून येथे आलेले आहेत. ते आपल्या हाताला मिळेल ते विविध कामे करुन उपजीविका भागविणारे परप्रांतीय मजूर कुटुंबीयांसह आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने लाॅकडाउन अकरा दिवसांचा जाहीर केला असला तरी तो अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परप्रांतीयांचे व्यवसाय, मजुरी बंद झाली आहे. उपासमारीची वेळ परप्रांतीय मजुरांना वाटत आहे.

ता. 24 मार्चपासून विविध भागातील मजूर नांदेडसह पूर्णा, परभणी, मुदखेड, औरंगाबाद आदी रेल्वेस्थानकावर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातील आपल्या मुळ गावाकडे जाण्यासाठी दाखल होत आहेत. सध्या केंद्र सरकारने लाॅकडाऊन जाहीर केला नसून रेल्वेगाड्या सुरु आहेत. रेल्वेने मजूरवर्ग गावाकडे परतत आहेत. काही मजूरांकडे गावी परतण्यासाठी पैसे देखील नाहीत. तर काहींना भोजनगृहण करण्यास देखील पैसे नाहीत. या स्थितीमध्ये मजूर हतबल होत असून अनेक मजूरांनी आपल्या अडचणी मांडत आहेत. 

जर लाॅकडाऊन वाढत गेला तर पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊन सर्व कुटुंब अडचणीत पडेल, त्यामुळे येथील कामधंदा बंद झाल्याने जगावे कसे असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बिहारमधील मजूर नदीपात्रातून वाळूचा उपसा करणारा मजूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेला आहे. लाॅकडाऊन झाल्यामुळे गावाकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकात दाखल होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT