file photo 
नांदेड

नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभड परीसरात रविवारी (ता. चार)  एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. यामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार गजानन महाजन यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला तर त्यांची पत्नी शीतल महाजन या गंभीर जखमी झाल्या असल्याची घटना दुपारी घडली.
      
चैतन्यनगर नांदेड येथील व एका सलूनमध्ये काम करणारे गजानन बाबुराव महाजन (वय ३०) वर्ष हे  पाहुण्याकडे उमरखेड परिसरात गेले असता तेथून स्वतः व पत्नी दोघे परत नांदेड शहरातील चैतन्यनगर येथे येत होते. 

नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर तालुक्यातील दाभड परिसरात बाबा पेट्रोल पंपच्या बाजूला मोटर सायकल ( एम.एच.२६ ए.बी. २६५३ )अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला. यावेळी गजानन बाबुराव महाजन वय तीस वर्ष हे गंभीर जखमी झाले व जागीच त्यांनी प्राण सोडला. तर त्यांच्या पत्नी शितल महाजन या गंभीर जखमी झाल्या असता त्यांना महामार्ग पोलीस केंद्र अर्धापूर यांच्या रुग्णवाहिकेत ने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी घटनास्थळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, महामार्गचे अरुण केंद्रे यांनी पाहणी केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT