ज्वारी, मका खरेदी केंद्र सुरु करा 
नांदेड

ज्वारी- मक्का खरेदी न केल्यास किसान सभेच्या वतीने आंदोलन-अर्जुन आडे

आदिवासी विकास महामंडळ मार्फत ज्वारी- मका खरेदी करण्याची अंतीम मुदत ही बुधवार (ता. ३० ) अशी आहे.

मिलींद सर्पे

किनवट ( जिल्हा नांदेड ) : ज्वारी- मका खरेदी केंद्र सुरु ठेवा, तसेच सरसकट सर्व आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी न झाल्यास तिव्र आंदोलन छेडू, असा इशारा किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी दिला आहे.

आदिवासी विकास महामंडळ मार्फत ज्वारी- मका खरेदी करण्याची अंतीम मुदत ही बुधवार (ता. ३० ) अशी आहे. खरेदी केंद्र जलधरासाठी एक हजार ८०० तर, चिखली केद्रांसाठी एक हजार २०० शेतकऱ्यांनी खरेदी करिता आॅनलाईन अर्ज केले आहेत. शासनाने दिलेल्या आदेशानुसार सदर खरेदी ही दोन जुनपासून सुरु झालेली आहे. जलधरा आणि चिखली ही खरेदी केंद्र बंद करुन ती किनवट येथे हलवण्यात आलेली आहेत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारी नुसार तिन हजार शेतकऱ्यांपैकी फक्त २५० च्या जवळपास शेतकऱ्यांची ज्वारी- मका खरेदी झालेली आहे.अजूनही ९५ टक्के शेतकरी खरेदीपासून वंचित आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ता. ३० जून ही खरेदीची अंतिम मुदत आहे. पण झालेल्या खरेदीचा विचार करता खरेदी केंद्रासाठी मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. खरेदी प्रक्रियेचा वेग वाढवून, गोदामांची योग्य व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणीही किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा - दिलासादायक : नांदेडला मंगळवारी कोरोनाचा एकही बाधित आढळला नाही

बाहेर खासगी विक्री केल्यास अत्यंत कमी दराने व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेत आहेत. शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला दर मिळेल. निर्माण झालेल्या गोंधळामुळे आॅनालाईन केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासन, प्रशासनाने तातडीने या गोंधळातुन मार्ग काढावा, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी तातडीने यातून मार्ग काढावा.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदी कोसळले! पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; काय आहे ताजा भाव?

राज ठाकरे यांचे निकटवर्तीयाचा Mumbai Pune Expressway वर भीषण अपघात; पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू

Chhatrapati Sambhajinagar: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर SRPF पोलिसाचा अत्याचार, लग्नाचं आमिष दाखवत केलं गंभीर कृत्य

नीटची परीक्षा २१ जूनला होणार, फेरपरीक्षेची तारीख जाहीर

Stock Market Today: इंधन दरवाढीनंतरही शेअर बाजारात तेजी! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT