file photo 
नांदेड

पंचशील, अष्टांग मार्गाचे पालन केले तर मानव दुःखमुक्त होईल- भन्ते सत्यानंद महाथेरो 

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील लहान- लोणच्या तपोवन बुद्धभूमीत दोन दिवशीय चालणा-या  धम्मपरिषदेला सोमवारी (ता. आठ)  धम्मध्वजारोहन करुन सुरुवात झाली. या धम्म परिषदेचे उद्घाटन  महाउपासक डाॅ एस. पी. गायकवाड यांच्या यांच्या हस्ते  करण्यात आले.

ही धम्म परिषद पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस चालणार आहे. आठराव्या धम्म परिषदेला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. यावेळी पूज्य भदंत पय्यारत्न ( नांदेड ), पूज्य भदंत कमलबोधी ( पुसद ), पूज्य भदंत शीलरत्न, पूज्य भदंत सुबोती यांच्यासह भिक्खु संघाची धम्मदेशना झाली. धम्मध्वजारोहण लहान येथील ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत भिक्खू संघाच्या हस्ते संपन्न झाला.

भिक्खूसंघाने धम्मदेसना देताना पंचशीलाचे पालन केले तर मानव दुःखमुक्त होईल. अष्टशीलाचे पालन केले पाहिजे. विज्ञानवादी धम्म स्विकारला तर देशावर कसलेही संकट येणार नाही असे प्रतिपादन केले. या दोन दिवशीय धम्म परिषदेत मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत धम्मदेसना होणार आहे. या धम्म परिषदेला चाभरा, चेनापुर, लहान- लोण यासह परिसरातील उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अर्धापूर पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक श्री. राठोड व किशोर पाटील उपस्थित होते. या धम्म परिषदेचे प्रास्ताविक संजय लोने यांनी केले तर सूत्रसंचालन शामराव लोणे यांनी केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT