file photo 
नांदेड

अवैध देशी, विदेशी, ताडीसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त-  निलेश सांगडे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैधरित्या देशी, विदेशी व ताडी विकणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मारतळा, हस्सापूर, सुगाव व नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळच्या सुमारास केली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या पथकाकाडून जिल्हाभरात अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. निरीक्षक एस. एस. खंडेराय आणि दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार यांच्या पथकांनी नांदेड शहरात गस्त घालण्यास सुरूवात केली. या दोन्ही पथकांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी लोहा तालुक्यातील मारतळा, नांदेड तालुक्यातील सुगाव, हस्सापूर आणि नांदेड शहराच्या अण्णाभाऊ साठे चौकात कारवाई केली. 

यांची होती पथकातील कामगीरी 

या विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत पथकांनी एक दुचाकी व चारचाकी दोन यासोबतच १३० लीटर विदेशी दारु, दहा लिटर देशी आणि ६० लीटर ताडी असा पाच लाख एक हजार ४६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पथकांनी चार आरोपीना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाईनंतर त्यांना सोडण्यात आले. या कारवाईत एस. एस. खंडेराय, भगवान मंडलवार, मोहमद रफी, जवान श्री. इंगोले, परमेश्‍वर नांदूसेकर आणि श्री. नागमवाड यांनी परिश्रम घेतले.

अवैध दारु विक्री व साठा करून ठेवणाऱ्यांवर हदपारीचा प्रस्ताव

जिल्ह्यात किनवट, माहूर, धर्माबाद, देगलुर, कुंडलवाडी, मुदखेड या परिसरात अवैध दारु विक्री व हातभट्टी दारु मोठ्या प्रमाणात तयार करतात. मात्र आमचे पूर्ण अशा हातभट्टी अड्ड्यावर असून वेळोवेळी संबंतीवार कारवाई करण्यात आली आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात बनावट दारु तयार करणारे कारखाने उद्धवस्त केले असून काही प्रमाणात तयार होणारी हातभट्टी ही लपूनछपून तयार करीत असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. देशी, विदेशी, हातभट्टी आणि ताडी अवैधरित्या विक्री किंवा साठे करणाऱ्यांविरुद्ध कडक पाऊले उचलण्यात येत असून अशा लोकांची धरपकड सुरू करण्‍यात आली आहे. जिल्ह्यात अवैध दारु विक्री व साठा करून ठेवणाऱ्यांवर हदपारीचा प्रस्ताव यापूर्वीच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. 
निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT