पीक विमा योजना Esakal
नांदेड

रब्बी पिकांसाठी पिक विमा योजना लागू

सहभागी होण्याचे आवाहन; गहू, हरभरा, रब्बी ज्वारीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पंतप्रधान पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये राबविण्यात येणार आहे. विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकांसाठी दिड टक्के असा मर्यादीत आहे. जिल्ह्यातील गहु (बागायती), ज्वारी (जिरायती), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत गहु (बागायती) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३८ हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता हेक्टरी ५७० रुपये आहे.

विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापुर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हे हदगाव आहेत. पिक विमा ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर राहिल. ज्वारी (जिरायती) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम हेक्टरी २८ हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता हेक्टरी ४२० रुपये आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव हे आहेत. पिक विमा ऑनलाइन करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. हरभरा या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३५ हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये हेक्टरी ५२५ रुपये आहे.

विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी ही आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर राहिल. ---- कोट ही योजना इफको टोकीयो जनरल इंन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख या ज्वारी जि. पिकासाठी ता. ३० नोव्हेंबर असून गहु बा. व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा.

- रविशंकर चलवदे,

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: १४ व्या वर्षीच वैभवनं युवराज, रैनाचा विक्रम तर मोडलाच, आता लक्ष्य या विश्वविक्रमावर

Crime News : नाशिकमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ नागरिकांचा मोबाईल गहाळ करून ४ लाखांची लूट

Video : सावधान! तुम्ही कचरा तर खात नाही ना? हॉटेलमध्ये शिजत असलेल्या जेवणात कचरा टाकल्याचा किळसवाणा व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Updates : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Budh Gochar 2025: बुध ग्रहाची वक्री गती, मिथून राशीसह 'या' 5 राशींना येतील पैशाबाबत अडचणी

SCROLL FOR NEXT