nanded sakal
नांदेड

Nanded News : शंखतीर्थ घाटातील बोटी उद्ध्वस्त ; तहसीलदारांची मोठी कारवाई

व्हाईट कॉलर वाळू माफिया सैरभैर झाले असून राजकीय लोकांचे उंबरठे झिझवनाऱ्यांना मोठी चपराक बसली असताना आता वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक पाणबुडीचा शोध प्रशासनाला लागेल का? हेच पाहावे लागेल.

सकाळ वृत्तसेवा

मुदखेड : मुदखेड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शंखतीर्थ व देवापूर गोदावरी घाटात राजकीय वरदहस्ताने अवैध वाळूचा बेलगाम उपसा चालू होता. यातच आता तहसीलदार व महसूल विभागाच्या पथकांनी कार्यवाही करत आठ तराफे नष्ट करीत जेसीबीच्या तीन विद्युत बोट नदी पत्रातून बाहेर काढत जप्त केल्या आहेत. व्हाईट कॉलर वाळू माफिया सैरभैर झाले असून राजकीय लोकांचे उंबरठे झिझवनाऱ्यांना मोठी चपराक बसली असताना आता वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक पाणबुडीचा शोध प्रशासनाला लागेल का? हेच पाहावे लागेल.

प्रशासनावर हल्ले करणे, धमकावणे, धाब्यावर बसवण्याची भाषा करणे असे अरेरावीचे प्रकार राजकीय पदाचा वापर करीत सातत्याने घडत आहेत. या सर्व गंभीर बाबींची दखल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तालुक्याच्या महसूल प्रशासनाला शंखतीर्थ व देवापूर येथील गोदावरी घाटातील वाळूची अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर व उपविभागीय अधिकारी सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाचे प्रमुख तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता.पाच) रोजी जेसीबीच्या साहाय्याने मोठी कार्यवाही केली आहे.

दबाव तंत्राचाही केला वापर

या धाडसी कार्यवाहीत आठ तराफे उध्वस्त करण्यात आले असून नदीतील तीन विद्युत डुबत्या बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी वाळू माफियांनी सैरभैर होत कार्यवाही होणार नाही यासाठी राजकीय लोकांना संपर्क करीत दबावाचे तंत्रही वापरल्याचे समजते. परंतु राजकीय लोकांनी अवैध उपशाबद्दल हात वर करताच व्हाईट कॉलर माफियांच्या पायाखालची वाळूच सरकल्याची चर्चा दिसून येत आहे. या कार्यवाहीत नायब तहसिलदार मारोती जगताप, मंडळ अधिकारी पठाण, बोधमवाड, बालाजी कुऱ्हाडे, कोटूरवार, चव्हाण, तलाठी येडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

MPSC Student Agitation : टिळक चौकातील आंदोलनाकडे नेत्यांची पाठ; उणिवा दुरुस्त करा, पण पद्धत बदलू नका; विद्यार्थ्यांची भूमिका

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT