stopped eating for full time professor recruitment Images By Whats up
नांदेड

पूर्णवेळ प्राध्यापक भरतीसाठी सीएचबीधारकाचा अन्नत्याग; शासन कुंभकर्णी झोपेत

हजारो विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेऊन बेकार आहेत

सकाऴ वृत्तसेवा

नांदेड : वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती बंद असल्याने नेट-सेट, पीएच.डी.धारक हजारो विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेऊन बेकार आहेत. विविधप्रकारची आंदोलने करून, मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदनेही दिलीत. परंतु, प्राध्यापक भरतीबाबत शासनाची उदासीनताच दिसत आहे. राज्यात सुमारे १५ हजार पदे रिक्त आहेत. ही पदे शंभर टक्के भरून २२ वर्षापासून उच्चशिक्षित तरुणांचे मानसिक शोषण करणारे सीएचबी धोरण बंद करावे, म्हणून नेट-सेट पीएचडीधारक संघर्ष समितीचे समन्वयक प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी गुरुवारपासून (ता.१५) घरीच अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

''गेली १० वर्षे महाविद्यालये आणि विद्यापीठात सुमारे १५ हजार सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त असताना जर नेट, सेट, पीएच.डी पात्रताधारकांच्या वाट्याला ‘अन्नत्याग’ करून मरण जवळ करण्याची वेळ येत आहे. शासनाने अंत पाहू नये, परिणाम वाईट होतील."

- प्रा. सुरेश देवढे पाटील, राज्य समन्वयक (नेट-सेट-पीएच.डी धारक संघर्ष समिती)

"देशाच्या भावी पिढ्या घडवणारे हात जर स्वतःचा गळा दाबून मरण पत्करायला लागले तर कसं होणार? शासनाने आजवर पाहिलेली परीक्षा खूप झाली. पुढचे अनर्थ टाळायचे असतील तर डॉ. पौळ यांच्या अन्नत्याग आंदोलनाची वेळीच दखल घ्यावी."

- डॉ. रमेश वाघमारे (जालना जिल्हा समन्वयक)

"शासनाने सीएचबी प्राध्यापकांची पदभरती तत्काळ करावी. यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रा. पौळ यांच्या अन्नत्यागाची दखल घेवून शंभर टक्के पदभरती सुरु करावी."

- प्रा. डॉ. माधव शिंदे, नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT