नांदेड जिल्ह्यात खते- बियाणे मुबलक 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध- रविशंकर चलवदे

जिल्ह्यात तीन लाख क्विेंटल सोयाबीन बियाणे आवश्यक आहे. यापेकी साठ ते सत्तर टक्के बियाणे शेतकर्‍यांकडे घरचे उपलब्ध आहे. तर बाजारा ६५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : आगामी खरीप हंगामाकरिता लागणारे बियाणे, खते तसेच कीटकनाशकांची कमतरता भासणार नाही. याबाबत कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शेतकर्‍यांनी उपयुक्त पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनील केले आहे.

आगामी खरीप हंगाम २०२१- २२ साठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना लागणार्‍या बियाणे, खते तसेच किटकशानाकाच्या उपलब्धते बाबत सूक्ष्म नियोजन केले आहे. खाजगी, सार्वजनिक क्षेत्राकडून बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यामुळे सध्या तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व ज्वारी या वाणाचे बियाणे मुबलक प्रमाणात आहे. तसेच शेतकर्‍यांना लागणारे रासायनिक खतेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी पकडलेल्या वाळुच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी तीन लाखाच्या लाचेची मागणी

जिल्ह्यात तीन लाख क्विेंटल सोयाबीन बियाणे आवश्यक आहे. यापेकी साठ ते सत्तर टक्के बियाणे शेतकर्‍यांकडे घरचे उपलब्ध आहे. तर बाजारा ६५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार ३० हजार क्विंटल बियाणे पुन्हा उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय करु नये. घरच्या बियाणांची उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन श्री चलवदे यांनी केले आहे.

जिल्ह्याला दोन लाख दोन हजार ४१० टन खताची आवश्यकता आहे. तर दोन लाख नऊ हजार चाळीस टन खत आवंटन मंजूर झाल्याचे श्री चलवदे यांनी सांगितले. आजपर्यंत एक लाख ४० हजार ५४८ टन उपलब्ध झाले आहे. तर ६५ हजार ३८४ टन खताची विक्री झाली. ७५ हाजर १६४ टन शिल्लक आहे. डीएपी खताचे रेक सध्या उपलब्ध होत असल्याचे सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT