Corona Patients Sakal media
नांदेड

नांदेडला कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मंगळवारी २९ बाधित; ५९ जणांवर उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी (ता. चार) प्राप्त ८१२ अहवालापैकी २९ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. सध्या ५९ रुग्ण उपचार घेत असून दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.(in nanded Increase in the number of corona patients)

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ९० हजार ६०१ झाली असून यातील ८७ हजार ८८७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६५५ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका(nanded carporation) क्षेत्रात १८, नांदेड ग्रामीण, हिमायतनगर, मुखेड येथे प्रत्येकी एक, मुंबई एक, तर ॲटीजेन तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात तीन, मुदखेडला दोन, लोहा आणि मुंबई प्रत्येकी एक असे एकुण २९ बाधित आढळले आहे. दिवसभरात नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोनाबाधिताला औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या ५९ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरीतील सहा, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरणातील ४८, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील एक तर खासगी रुग्णालयातील चार जणांचा समावेश आहे.

नांदेड कोरोना मीटर

  1. एकूण स्वॅब - ८ लाख ९२

  2. एकूण निगेटिव्ह - ६ लाख ९५ हजार ९०६

  3. एकूण बाधित - ९० हजार ६०१

  4. एकूण मृत्यू - २ हजार ६५५

  5. एकूण बरे - ८७ हजार ८८७

  6. उपचार सुरू - ५९

  7. अतिगंभीर प्रकृती - दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT