In nanded there is crowd of laborers at chowks to get job for survival sakal
नांदेड

Nanded : नांदेडमध्ये चौक, नाक्यावर कष्टकऱ्यांची गर्दीच... दिवसभर थांबूनही मिळेना हाताला काम

Nanded Unemployment : शहरातील शेतकरी कामगार चौक, हिंगोली नाका रस्त्यावर सकाळी कष्टकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. भल्या पहाटेपासूनच येथे हाताला काम मिळेल या आशेने कष्टकरी येतात.

सकाळ वृत्तसेवा

- गौरव वाळिंबे

Nanded News : शहरातील शेतकरी कामगार चौक, हिंगोली नाका रस्त्यावर सकाळी कष्टकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. भल्या पहाटेपासूनच येथे हाताला काम मिळेल या आशेने कष्टकरी येतात. लिलाव केल्याप्रमाणे येथे मजूरी ठरते. त्यानंतर त्यांना घेऊन जाण्यासाठी लोक येतात.कधी दिवसभर थांबूनही हाताला काम मिळत नाही त्यामुळे रिकाम्या हाताने कामगार उद्याच्या आशेने घराची वाट धरतात.

शहरासह आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी कष्टकरी वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी येतो. मिळेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते. कधी त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळतो तर कधी नाईलाजाने कमी मजुरीवर समाधान मानून काम करावे लागते.

या परिसरात अनेक कामगार पहाटेच येऊन उभे असतात. अनेकदा योग्य मोबदला मिळतो तर काही वेळा त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मोबदला दिला जातो. विशेषतः मिस्त्रीकाम, मिस्त्रींच्या हाताखाली काम करणारे, मदतनिस, इतर कोणतेही काम करणारे कामगार येथे उभे असतात. उन्हाळा असो कि पावसाळा हे कामगार नियमित आपल्या जागेवर उभे असतात.

किती मिळते मजुरी?

येथील कामगारांची मजुरी हे कामावर ठरते. मिस्त्रीकाम करणाऱ्या कामगारांना जवळपास ८०० ते १००० रुपये दिवसभरासाठी मिळतात. मिस्त्रींच्या हाताखाली काम करणाऱ्यांना ५०० ते ७०० रुपये रोजा दिला जातो तर मदतनीस कामगारास ४०० ते ५०० रुपयांपर्यंत मजुरी देण्यात येते. इतर कामासाठी ४०० ते ६०० रुपयांपर्यंत मजुरी दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: मॉन्सूनच्या वाटचालीस वातावरण पोषक; विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

Panchang 27 May 2026 : पद्मिनी एकादशीसह बुधवारी खास योग! जाणून घ्या संपूर्ण पंचांग

आजचे राशिभविष्य - २७ मे २०२६

करिअर वेध : पराकोटीचा ध्यास

SCROLL FOR NEXT