1crime_33 
नांदेड

नांदेडमध्ये चाकू दाखवून चोरी,पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात

अभय कुळकजाईकर

नवीन नांदेड : सिडको (Cidco) परिसरातील (Nanded) वात्सल्यनगर सोसायटीमध्ये गुरूवारी (ता.२६) दुपारी बाराच्या सुमारास चोरटे तोंडाला रुमाल बांधून तिस-या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या रमेश दाचावार यांच्या घरात घुसले. सुनेला चाकुचा धाक दाखवून तिजोरीची चावी मागून तिजोरीत असलेल्या सोने व रोख (Crime In Nanded) रक्कम लुटून दुचाकीवर बसून पळून गेले. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांच्यासह श्वान पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिडको परिसरातील वात्सल्यनगर सोसायटीमध्ये रमेश दाचावार हे आपल्या दोन मुलांसह तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. रमेश हे काम निमित्ताने बाहेर गावी गेले होते.

दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सून अंकिता जवळील अंदाजे दीड वर्षाचा मुलगा साईला चाकु मारण्याची धमकी देत तिजोरीची चावी व इतर सोने चांदी दागिने कोठे आहेत? अशी मागणी केल्यानंतर भीतीपोटी चावी दिल्यानंतर तिजोरीत असलेल्या अंदाजे ५० तोळे सोने व एक किलो चांदी तसेच दोन लाख रुपये असा ऐवज चोरट्यांनी घेतला व नंतर ते दुचाकीवरून पळून गेले. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश मोरे, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शेख असद यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. दरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT