Sanjay Rathod  sakal
नांदेड

Sanjay Rathod : तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ; ग्रामीणमध्ये प्रयोगशाळेचे उद्‍घाटन

ग्रामीण भागाच्या विकासासाठी तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ठरू शकते. जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र सध्या महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवीन नांदेड : ग्रामीण भागाच्या विकासासाठी तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ठरू शकते. जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र सध्या महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत आहे. ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणे आता आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृदसंधारणमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी (ता. चार) केले.

नांदेड येथील ग्रामीण टेक्निकल ॲण्ड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी व कंधार येथील तांत्रिक व कृषी महाविद्यालयात भेट दिल्यानंतर नांदेड येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय पवार, प्राचार्य डॉ. विजय पवार, जिल्हा मृदसंधारण अधिकारी हनुमंत खटके, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी एल. शरमन, मीनाताई पवार, डॉ. राजेंद्र पवार, डॉ.पी.बी. उल्लागडी, उपप्राचार्य संजय देऊळगावकर, विभागप्रमुख प्रा. गुरुदीपसिंघ वाही, डॉ. नीलेश आळंदकर, डॉ. सुनील कदम, प्रा. देवयानी कापसे व शीतल राठोड आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक सचिव कै. शिवरामजी पवार यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. त्यांच्या दुरदृष्टीतून नांदेडसारख्या तांत्रिक शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. ओमप्रकाश दरक यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: ''..तर उद्याच शपथविधी'' सुनेत्रा पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

शाहरुख खानला सिक्युरिटीने चष्मा काढायला लावल्यावर, किंग खानने केलं असं काही की... पाहा Viral Video

Body Reset Diet: डाएट आणि फिटनेसचं रुटीन वारंवार बिघडतंय का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘रिसेट डाएट’ करून पाहा

Latest Marathi News Live Update : म्यानमार निवडणुकीत लष्कर-समर्थित USDPचा विजय, गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर निषेध

Sangli Election : मतदार शेतात, उमेदवारही शेतात; पलूसमध्ये प्रचाराचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT