file photo
file photo 
नांदेड

नांदेडातील घटना : वाहनातील फळं चोरण्यास विरोध केल्याने खंजरने एकाचा खून 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : उभ्या वाहनातील फळं चोरणाऱ्यांना विरोध केल्यामुळे संगनमत करुन चोरट्यांनी एकाच्या डोक्यात खंजर मारुन खून केला. तसेच चालकालाही मारहाण तरुन त्याच्या मोबाईल व रोख रक्कम जबरीने चोरुन नेली. ही घटना शासकिय दूध डेअरी वसरणी परिसरात ता. एक जानेवारीच्या रात्री घडली. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हदगाव शहरातील आजाद चौक येथे राहणारे ट्रक (आयचर) चालक युनूसखान गुलाबखान पठाण ( वय ४८) हे ट्रान्सपोर्टवरुन गंगाखेड, हदगाव, उमरखेड आदी भागात फळे व पालेभाज्या आपल्या वाहनाद्वारे पोचवितात. त्यांनी ता. 31 डिसेंबर रोजी नांदेडच्या एका ट्रान्सपोर्टवरुन आपल्या वाहनांमध्ये फळं भरली. त्यातील काही फळं मुजामपेठ (ता. नांदेड) येथील आपला नातेवाईक शेख नईम शेख मोईनोद्दीन (वय ५०) यांना देण्यासाठी केबिनमध्ये ठेवले. यानंतर शेख नईम यांना फोन करून दुध डेअरी चौक परिसरात बोलावून घेतले. तोपर्यंत त्यांनी आपले वाहन त्याठिकाणी जावून थांबविले.

दरम्यान पाठीमागून आलेल्या अजय भगवान माने (वय २१), दिपस्तंभ कांबळे, प्रेमजित कांबळे आणि वैभव भासिंगे सर्व राहणार वसरणी परिसर हे चौघे जण त्या ठिकाणी आले. उभ्या असलेल्या वाहनातून फळांचे कॅरट चोरत असताना शेख नईम यांनी त्यांना विरोध केला. यावेळी शेख नईम व चालक युनुसखान पठाण यांना मारहाण केली. एवढेच नाही तर शेख नईम यांच्या डोक्यात खंजरने मारुन जबर जखमी केले. तसेच चालक युनूसखान पठाण यांच्या जवळील एक मोबाईल आणि नगदी चारशे रुपये जबरीने चोरुन नेले. घटना घडल्यानंतर अन्य नातेवाईकांना बोलावून घेऊन गंभीर जखमी शेख नईम यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना तेथून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शेख नईम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी युनूसखान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात वरील चार जणांवर खून, जबरी चोरी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील अजय माने याला अटक केली असून तिघे जण फरार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री कासले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT