Nanded News sakal
नांदेड

Nanded News : नांदेडच्या रेल्वेस्थानकाचा अमृत योजनेत समावेश ; खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती

अमृत योजनेतंर्गत नांदेड रेल्वे स्थानकासह जिल्ह्यातील मुदखेड, धर्माबाद, उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. यासाठी आवश्यक तो निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अमृत योजनेतंर्गत नांदेड रेल्वे स्थानकासह जिल्ह्यातील मुदखेड, धर्माबाद, उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. यासाठी आवश्यक तो निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. त्यातून ही रेल्वेस्थानके अत्याधुनिक होतील, अशी माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगळवारी (ता. सहा) दिली.

देशभरातील रेल्वे प्रवाशांना सर्वोत्तम रेल्वे सेवा देता यावी. रेल्वेचे जाळे विणले जावे या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्रालयातून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात एकूण ३४ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्रातील १२६ रेल्वेस्थानके अमृत योजनेतंर्गत विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

यासाठीच आवश्यकता निधीही मंजूर करण्यात आला आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांसह नांदेड जिल्ह्यातील रेल्वेस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगून खासदार श्री. चिखलीकर यांनी रेल्वेस्थानकाचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

विविध रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

नांदेड जिल्ह्यातील नांदेडसह मुदखेड जंक्शन, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर आणि किनवट या रेल्वेस्थानकाचा कायापालट होणारा असून यासाठीचा निधी प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT