File photo 
नांदेड

नांदेडमध्ये जबरी चोरीतील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक, एका महिलेचा आहे समावेश

प्रमोद चौधरी

नांदेड : धानोरा मक्ता (ता.लोहा) येथील प्रल्हाद निवृत्ती कदम यांना पकडून त्यांच्याकडून २२ हजार रुपयांचा ऐवज पळवला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अधिक माहिती अशी की, प्रल्हाद कदम हे एचडीएफसी बॅंकेमध्ये एक जानेवारी २०२१ रोजी पीक कर्जाची रक्कम भरण्यासाठी आले होते. यादरम्यान बसस्थानक जवळ राखोजीनगर नांदेड येथील आरोपी शेख आवेज शेख अहेमद (वय २३) आणि रेखा शेख आवेज (वय २०) यांनी त्यांना अडवून खाली पाडले. यावेळी प्रल्हाद कदम यांच्याकडील रोख २० हजार रुपये आणि दोन हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण २२ हजार रुपये घेवून पळून गेले होते. त्यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर तपास करत होते. 

दरम्यान पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी आरोपींचा शोध घेऊन माल हस्तगत करण्याच्या सूचना वजिराबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिवले यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलिस अधिकारी सुनिल पुंगळे, उपनिरीक्षक शेख अब्दुल रब, दत्तराग जाधव, संजय जाधव, गजानन किडे, विजयकुमार नंदे, बबन बेडदे, चंद्रकांत बिरादार, शरदचंद्र चावरे, श्री. गंगुलवार यांनी गुप्त माहितीनुसार शेख आवेज शेख अहेमद आणि रेखा शेख आवेज यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीला गेलेल्या मालापैकी २०० रुपयांच्या ७४ नोटा (१४ हजार ८०० रुये) मिळाल्याने त्यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही दिन दिवसाची पोलिस कोठडीत पाठवले आहे. 

हे देखील वाचाच - परभणी : शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देणार्‍या डॉ. सुचिता पाटेकर, आधूनिक सावित्रीची लेक
 
शिवाजीनगरमध्ये जबरी चोरी 
नांदेड ः
शिवाजीनगर परिसरातील आधार हॉस्पीटलच्या पाठीमागे दोघांना आरोपींनी अडवून बळजबरीने खिशातील रोख रक्कम व मोबाईल हिसाकवून पळून गेल्याची घटना एक जानेवारी रोजी घडली. अधिक माहिती अशी की, लुंगार गल्ली कंधार येथील हरी सतीश लुंगरे हे नगर पालिकेच्या शौचालयात गेले होते. तेथून बाहेर पडल्यावर आरोपींनी त्यांच्या शर्टच्या खिशातील ४०० रुपये काढून चाकूने मारहाण केली. तसेच हरी लुंगरे यांचा मावस भाऊ शंकर शिंदे यांच्या जवळील रेडमी कंपनीचा नऊ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले. हरी लुंगरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक श्री. वाव्हळे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT