file photo 
नांदेड

अर्धापूर तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ, पशुधन, इलेक्ट्रीक वस्तु चोरीला

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असून शेतातील आखाड्यावरील चोरीच्या घटनेत वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. शेतातील पशुधानाची चोरी, विद्युत पंप, वायर अगदी चोरीच्या घटना झाल्या असून या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे. चोरीच्या घटनेने त्रस्त झालेले शेतकरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांचा सामना करित आहेत. चोरट्यांनी अत्ता आपला मोर्चा शेताकडे वळवला आहे.अर्धापूर- वारंगा रस्त्यावरील अर्धापूर शिवारातील बोरमध्ये टाकलेली विद्युत मोटार व वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. बोअरमधील विद्युत मोटार व वायर काढण्यासाठी बैलाचा वापर केला आहे. या प्रकरणी संदिप जवळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तर दुस-या एका चोरीच्या घटनेत अर्धापूर- शेणी रस्त्यावरीर सुरेश कंठाळे यांनी आपल्या शेतातील आखाड्यावरील जागेत गाय व वासरांना बांधले होते. या बांधलेल्या पशुधानाची चोरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. 

शेतातील वायर, विद्युत पंप, पशुधानाची चोरी होत आसल्यामुळे शेतक-यात भितींचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच खुप मोठा अर्थिक फटका बसत आहे. पोलिसांची गस्त कमी होत आहे. चोरीच्या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या फिर्यादीचीच उलट तपासणी करणे, चोरीच्या घटनेत गेल्या मुद्देमालाची रक्कम कमी टाकण्यासाठी सामुपदेशन करण्यात येते आशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर वारंवार होणा-या चोरीच्या घटनेत त्रस्त झालेले शेतकरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.

यापुर्वी आशाच चोरीच्या घटना झाल्या आहेत.तसेच शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.या घटनेचा छडा लावण्यात पोलीसांना यश आले नाही.पोलीसांनी गस्त वाढवून चोरट्यांच्या बंदोबस्त करावा आशी मागणी होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

Gold rate Today: नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज १ तोळ्याचा भाव किती?

Maternal Health : जिल्ह्यात ५ वर्षांत ३३ मातांचा मृत्यू; जिल्हा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT