File photo 
नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांचा वाढला निकाल,

प्रमोद चौधरी

नांदेड : माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) यावर्षी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढली आहे. गतवर्षी शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळा आणि विशेष अभियानाची ही फलनिष्पत्ती आहे. जिल्हा परिषदेच्या ७० पैकी ६५ शाळांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निकाल २६ टक्के वाढला असून ‘अ’ श्रेणीत १९०, ‘ब’ श्रेणीत २३२ तर पास श्रेणीत १६५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

आदिवासी दुर्गम क्षेत्रातील जिल्हा परिषद हायस्कूल कन्या किनवटचा गतवर्षीच्या निकाल शून्य होता तर यावर्षीचा निकाल ७० टक्के आहे. जिल्हा परिषद हायस्कूल बोधडीचा निकाल गतवर्षी २८ टक्के होता. यावर्षी ८९ टक्के झाला आहे. जिल्हा परिषद हायस्कूल मांडवीचा निकाल गतवर्षी ३९ टक्के होता तो यावर्षी ९० टक्के झाला आहे. जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल तालुका देगलुर, जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली व जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर वगळता इतर सर्व शाळांमध्ये निकालाची टक्केवारी भरघोस वाढली आहे.

हेही वाचा - नांदेडमध्ये कोरोनाचे थैमान सुरुच: शुक्रवारी १५४ रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू, संख्या पोहचली १८३९ वर

२०१८-१९ या वर्षात गणित, विज्ञान, इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक व मुख्याध्यापकांच्या दोन कार्यशाळा घेण्यात आल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर व शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचलेच पाहिजे - कोरोना व्हायरस : पायोनियर कंपनीत एका अधिकाऱ्यांकडून २० जण बाधित ​

यामुळे वाढला निकालाचा टक्का
पहिली कार्यशाळा दिवाळीपूर्वी व दुसरी कार्यशाळा दिवाळीनंतर परीक्षेआधी एक महिन्यापूर्वी घेण्यात आली. या कार्यशाळेत शाळानिहाय व विषय निहाय आढावा घेऊन विद्यार्थ्यांची अनुत्तीर्ण होण्याची कारणे शोधली. कोणत्या विषयात विद्यार्थी मागे पडतात आणि का मागे पडतात? याची कारणमीमांसा करून निकाल वाढविण्यासाठीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला.

येथे क्लिक कराच - नांदेड शहरातील गरीबांच्या घरांसाठी तब्बल 70 कोटींचा निधी- अशोक चव्हाण

संपूर्ण दिवाळी सुट्टीत सुट्टी न घेता शिक्षक व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. प्रशासनाच्या आवाहनाला दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सोशल मीडियाचा वापर झेडपी स्टॅंडर्ड टेन नॉर्थ व साउथ असे व्हाट्सअपचे दोन ग्रुप केले. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी  होते. दोघेही दररोज त्यावर टाकण्यात येणारा प्रतिसाद पाहत शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षकांना प्रोत्साहन देत, त्यामुळे शिक्षक अधिक जोमाने कामाला लागले.

कॉपीमुक्त परीक्षा आणि निकालात वृद्धी हे ध्येय ठेवून अध्यापनाच्या दिशा निश्चित केल्या. यावर्षी वाढलेली निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी यापुढील काळातही प्रयत्न करण्यात येणार आहे.
- बी. आर. कुंडगीरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Marathwada ACB : मानधन काढून देण्यासाठी पैशांची मागणी; लाच स्वीकारताना दोन आशा वर्कर ताब्यात!

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Baramati Crime : कट रचून खून केल्याचे सिद्ध; बारामती न्यायालयाचा निकाल; आरोपींना आजन्म कारावास!

Pune News : भाजप उमेदवाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले; मद्याच्या बाटल्यांसह मोटार जप्त!

SCROLL FOR NEXT