file photo 
नांदेड

इंदिरा गांधी देशासाठी कार्य करणार्‍या महान नेत्या- गुणवंत मिसलवाड

प्रल्हाद कांबळे

नांदेड- भारत स्वातंत्र्य चळवळीसाठी व भारत स्वातंत्र्यानंतर मोलाचे योगदान देणार्‍या इंदिरा गांधी ह्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातल्या स्वातंत्र्य सेनानी, महान नेत्या होत्या असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते गुणवंत मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार येथे स्वतंत्र भारताच्या तिसर्‍या व पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त एस. टी. डेपो नांदेड आगार कर्मचार्‍यांच्यावतीने गुरुवार (ता. १९) रोजी सकाळी ११ वाजता कोव्हिड-१९ चे शासन नियम पाळून जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इंदिरा गांधी यांनी वयाच्या ११ व्या वर्षापासून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, रविंद्रनाथ टागोर यांच्या कार्यावर व विचारावर प्रभावित होऊन राष्ट्र सेवा केली. ४१ विदेशांचे अभ्यास दौरे करुन भारत सक्षमीकरणासाठी मोलाचे योगदान दिले असून आपण सर्वांनीच युवा पिढीसहीत त्यांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करुन इंदिरा गांधी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

सर्वप्रथम आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संदीप गादेवाड, वाहतुक निरीक्षक राजकुमार टिपराळे, शेख सलीम, चार्जमन श्रीनिवास रेणके, विठ्ठल इंगळे, रघुनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश गहिरवार यांनी केले तर आभार विनोद हातागळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर पवार, संदीप देशमुख, हरी वरळे, गिरीश कुलकर्णी, राजीव घंटे, मनोहर माळगे, भगतसिंघ सिद्धू, श्‍वेता तेलेवार, लताबाई जाधव, शिवचरण मळगे, रमेश आन्येबोईनवाड यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: खिशात फक्त 20 रुपये घेऊन अमेरिकेत पोहोचले, आज अब्जावधींचे मालक! भारतीय उद्योजकाचा डंका

Khambatki Ghat Tunnel Route : सातारा-पुणे महामार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा! खंबाटकी घाटात 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली

Latest Marathi News Live Update : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; पाच जण जखमी

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

SCROLL FOR NEXT