Nanded News 
नांदेड

ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव : डॉ. संजीव बंटेवाड 

प्रमोद चौधरी

नांदेड : सद्यस्थितीत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकांवर दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचा मंत्र मत  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे डॉ. संजीव बंटेवाड यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.  

त्यांनी सांगितले की, पिकात रोपावस्थेत पहिल्या दोन अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खात असल्यामुळे पानावर पांढरे चटटे दिसतात. नंतरच्या अवस्थेतील अळ्या पोंग्यामध्ये प्रवेश करुन पाने खाण्यास सुरवात करतात. त्यामुळे पाने कुरतडल्यासारखी दिसतात. पानांना छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. 

अमेरिकन लष्करी अळींवर नियंत्रण मिळविण्यासाठी १०-२० टक्के प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टिन बेन्झोएट पाच एसजी चार ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम १२.६ टक्के, अधिक लॅमडा साहलोथ्रीन ९.५ टक्के, झेडसी पाच मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के, एस.सी. ४ मिली किंवा स्पायनोटोरम ११.७ एस. सी. पाच मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सुरवातीपासुन एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करावा असे आवाहनही डॉ. संजीव बंटेवाड यांच्यासह डॉ. अनंत बडगुजर, डॉ. संजोग बोकन, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. राजरतन खंदारे यांनी केले आहे.  

  • पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील मोठ्या अळया गोळा करुन नष्ट कराव्यात.
  • किडीच्या सर्वेक्षणासाठी सुरवातीपासून एकरी पाच कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी १५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.३) सुरवातीच्या वाढीलच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. 
  • प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक नोमोरिया रिलाई ५० ग्रॅम किंवा मेटार्हाजिएम ऍनिसोपल्ली ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. 
  • प्रादुर्भाव आथीर्क नुकसान पातळीच्या वर गेल्यास खालील किटकनाशकांचे आलटून पालटून फवारणी करावी. द्रावण पोंग्यात जाईल याची काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT