Inflation affect common man Banks arrears nanded Inflation will hit
नांदेड

नांदेड : सामान्यांना होरपळतोय महागाईचा आगडोंब

महिलांचे गणित बिघडले : कुटुंबप्रमुखाच्याही चिंतेत झाली वाढ

प्रमोद चौधरी

नांदेड : मार्च महिना तसाही सर्वांसाठी डोकेदुखीचाच ठरतो. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या झळांनी सर्वांना बेहाल करून सोडले होते. आता कोरोनाच्या या लाटेपासून कसेबसे सावरत असताना व अनेकांकडे बॅंकांची थकीत रक्कम झालेली असताना ती भरण्यासाठी बॅंकांकडून तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे बॅंकांची थकीत रक्कम ही मार्च एण्डच्या पूर्वी भरण्याची धडपड करणाऱ्या नागरिकांना आता महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. ही महागाई आता नागरिकांच्या जीवावर उठली असून जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती तर गगनाला भिडल्या आहेत.

कोरोना संकटामुळे अनेकांचे वेतन रखडले, कोणाचे कमी झाले, अनेकांचा रोजगार हिरावला तर काहींचे उद्योगधंदे बुडालेत. अशा लोकांकडे उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वर्षांपासून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती न परवडणारी झाली आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालल्याने जगावे की मरावे? अशी परिस्थिती सर्वसामान्यांवर आली आहे.

सर्वसामान्य गेले गोंधळून

शहरासह ग्रामीण भागामध्येही अगदी शेवटच्या घटकापर्यंत गॅस सिलेंडर पोचला आहे. प्रत्येकाकडे सिलेंडर असल्याने राॅकेल मिळत नाही. त्यामुळे सिलेंडरशिवाय पर्यायच उरलेला नाही. मात्र, त्याचे भाव पाहता तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्या जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया महिलांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या सतत वाढत चाललेल्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र गोंधळून गेला आहे.

सेवा देखील महागण्याची भीती

तेल विपणन कंपन्यांनी अलीकडेच बल्क ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर २५ रुपयांनी वाढ केली. रेल्वे, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, खासगी बस वाहतूकदार, माॅल्स आणि संरक्षण क्षेत्रातील आस्थापना प्रामुख्याने बल्क ग्राहकांमध्ये येतात. त्यामुळे या क्षेत्रांशी संबंधित सेवा देखील महागण्याची भीती सर्वसामान्यांना सतावत आहे.

वाढत्या दराचे चटके सामान्य गृहिणीला सहन करावे लागणार आहेत. शिवाय पेट्रोल, डिझेलचेही दर वाढवले आहेत. एवढ्या महागाईचा आगडोंब उठत असताना विरोधकमात्र मूग गिळून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’च्या भूमिकेत वावरत आहेत.

- प्रा. सरोजनाबाई वामनराव टेकाडे, सामाजिक कार्यकर्त्या, नांदेड.

जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करण्याचा सपाटाच केंद्र व राज्य सरकारने लावला आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनी या जीवघेण्या महागाईत जगावे तरी कसे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गॅसची ही दरवाढ आता परवडणारी नाही.

- सुहासिनी श्रीरंगराव कुलकर्णी, नवीन कौठा, नांदेड.

घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपयांची वाढ झाल्याने आता महागाईमुळे सर्वजण होरपळून निघतील. तसेच पेट्रोल व डिझेलचीही दरवाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूही महागणार आहेत. त्यामुळे संसाराचे अंदाजपत्रकच कोसळले आहे.

- सरोजनीबाई जंगमवाड, सिडको, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT