inflation Owa expensive Cardamom three hundred rupees per kg sweet foods 
नांदेड

Nanded : ओवाही झाला महाग, विलायची प्रतिकिलो तीनशे रुपयांनी महागली; गोड पदार्थांची बिघडणार लज्जत

मसाल्यांसह विविध मिष्ठान्न पदार्थांची चव बदलण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गोड पदार्थांसह चहाची लज्जत वाढविण्यासाठी विलायचीचा वापर अनिवार्य ठरतो. पण आता या पदार्थांचा सुगंध आणि गोडवा कमी होण्याची चिन्हे आहेत. कारण गेल्या १५ दिवसांत मसाल्याची राणी असलेल्या विलायचीचे भाव कडाडले आहे. विलायचीच्या दरात प्रती किलो तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे मसाल्यांसह विविध मिष्ठान्न पदार्थांची चव बदलण्याची शक्यता आहे.

भारतात सर्वाधिक मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन केरळमध्ये घेतले जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक विलायचीची आवक ही केरळातूनच होते. मात्र, काही काळापासून विलायचीला बाहेर देशातून मागणी वाढली आहे.

त्यातच उत्पादन घटल्याने विलायचीचे भाव गेल्या १५ दिवसांत वाढले आहेत. यामुळे आता गोड पदार्थातून मसाल्याची राणी विलायची गायब होण्याच्या मार्गावर आहे. तर, सामान्यांच्या आहारालाही आता महागाईच्या झळा बसत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी विलायची प्रति किलो एक हजार दोनशे रुपये होती. ती आता दीड हजार रुपयांवर गेल्याचे ड्रायफ्रुट व्यापाऱ्यांनी सांगितले.

विलायचीचे आरोग्यासाठी फायदे

आरोग्याच्या दृष्टीने विलायचीचे विशेष महत्त्व आहे. अॅसिडिटी, तणाव, रक्तदाब, बद्धकोष्ठता, मुत्र संसर्ग, पचनाचा त्रास अशा विविध गोष्टींसाठी विलायची उपयुक्त आहे. पण मसाल्याच्या पदार्थातून विलायची बेपत्ता होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा धोका आरोग्यालाही निर्माण होऊ शकतो.

ओवा दिडशेनी महागला...

ओवा खाण्यामुळे पचनक्रिया सुधारत असल्याने स्वयंपाकात त्याचा नियमित वापर होतो. पावसाळ्यात भजी अथवा इतर तळलेल्या पदार्थाचा बेत नेहमीच केला जातो. अशावेळी ओव्याचा उपयोग केला जातो.

यामुळे पदार्थांचा खमंगपणा तर वाढतोच शिवाय पचनक्रियेलाही त्याचा फायदा होतो. पंधरा दिवसांपूर्वी दोनशे रुपये किलो असलेला ओवा आता ३४० -३५० रुपये प्रती किलोवर पोहचला आहे.

विलायचीच्या दरात सतत वाढ होत आहे. विदेशात मोठ्या प्रमाणात विलायचीची निर्यात वाढल्याने देशांतर्गत विलायचीच्या दरात वाढ झाली आहे. अजूनही भाव वाढण्याची शक्यता आहे.

- अर्जुन मणियार, ड्रायफ्रुट विक्रेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs KKR Live: अजिंक्य रहाणेचे सर्व डावपेच फसले; पॉवर प्लेमध्ये KKR चा फुसsssका बार.. IPL 2026 मध्ये नकोसा विक्रम नावावर

Karnataka Political Crime : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेस आमदाराला जन्मठेपेची शिक्षा, न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

खरातसारखी प्रकरण थांबणार नाहीत! भारत गणेशपुरे असं का म्हणाले? म्हणाले, 'लोकांना पैशांची इतकी हाव...'

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

SCROLL FOR NEXT