file photo 
नांदेड

नांदेडचा जखमी लांडगा उपचारासाठी नागपुरात 

प्रल्हाद कांबळे

नांदेड ः नांदेड वन परिक्षेत्राअंतर्गत इस्लापूर वनपरिसरात रस्ता ओलांडत असलेल्या लांडग्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या लांडग्याला इस्लापूर येथे प्राथमीक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केले आहे. त्याच्यावर तिथे उपचार सुरु असून तो लवकरच बरा होईल अशी अपेक्षा उपवनसंरक्षक राजेश्वर सातेलीकर यांनी व्यक्त केली.  

विदर्भातील अकराही जिल्ह्यातील वन्यप्राणी येथे उपचारासाठी नेण्यात येतात. आता मराठवाड्यातील वन्यप्राणीही उपचारासाठी येऊ लागले आहेत. येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी वरदान ठरत आहे. इस्लापूर (ता. किनवट) परिसरात रस्ता ओलांडत असलेल्या एका लांडग्याला अज्ञात वाहनाने तीन दिवसापूर्वी धडक दिली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. इस्लापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर इस्लापूर प्राथमीक रुग्णालयात उपचार करण्यात आला. 

लांडग्याच्या कंबरेचा एक्सरे घेण्यात आला

मात्र त्याची प्रकृती गंभीर होत चालल्याने वनिभागाच्या तीने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या कंबरेला दुखापत झाल्याचे निदर्शनात आले आहे. लांडग्यावर शस्त्रक्रिया केल्यास तो कायमचा अपंग अथवा चांगलाही होण्याची शक्यता असल्याचे पशुवैद्यकांचे म्हणणे आहे. लांगडा हा अनुसूचि एकमधील वन्यप्राणी आहे. लांडग्याच्या कंबरेचा एक्सरे घेण्यात आला असून दुखापत गंभीर असल्याची माहिती मिळाली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT