तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या 
नांदेड

पोलिस असल्याचे सांगून वाहनांची तपासणी; तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या

राञीच्या गस्तीवर असलेल्या ख-या पोलिसांची अचानक चिञपटात एंन्ट्री व्हावी तशी झाल्यामुळे तोतया पोलिसांनी त्याठिकाणाहून पळ काढला. त्यातले दोघे दुचाकीवर पसार झाले तर एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले.

विनोद आपटे

मुक्रमाबाद ( जिल्हा नांदेड ) : राञीच्या वेळी आडमार्गाचा फायदा घेत पोलिस असल्याचे खोटे सांगत ट्रक चालकाची व वाहनाची तपासणी करत असताना राञीच्या गस्तीवर असलेल्या ख-या पोलिसांची अचानक चिञपटात एंन्ट्री व्हावी तशी झाल्यामुळे तोतया पोलिसांनी त्याठिकाणाहून पळ काढला. त्यातले दोघे दुचाकीवर पसार झाले तर एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले. ही घटना बुधवार (ता. ३०) रोजी रात्री साडे बारा वाजता घडली.

उदगीर ते देगलूर रोडवर असलेल्या कर्नाटक राज्यात जात असलेल्या बावलगाव फाटा येथे आडमार्गावर राञी साडेबारा वाजता बाळू उत्तमराव बलांडे, हे. ट्रक क्रमांक KA38-5892 घेऊन जात असताना राजू गंगाधर राठोड, सोनू विनायक जाधव, माधव गणपत देवमारे, सर्व राहणार बावलगाव ता.औराद जिल्हा बिदर ( कर्नाटक ) येथील असून हे, तिघेही अंधार व आडमार्गाचा फायदा घेत अचानक धावत्या ट्रकसमोर आपली दुचाकी आडवी लावून आम्ही पोलिस आहोत. अशी खोटी बतावणी करत चालकाला दमदाटी करुन ट्रकची व ट्रकची व चालकाच्या कागदपञाची तपासणी करुन तुझ्या मालकाला फोन लाव अशी दमदाटी केली.

हेही वाचा - आपल्या काळ्या आईची सेवा करित कष्टाने अन्नधान्न पिकवतो. अशाच अर्धापुरातील शेतकरी कुटंबातील तरुणांनी नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.

मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, उत्तम गायकवाड, शिवकुमार इंगळे, सतिष घुमलवाड, हे पथक राञीच्या गस्तीवर होते. राञीच्या वेळी आडमार्गावर ट्रक थांबल्याने गोपीनाथ वाघमारे यांनी ट्रकच्या दिशेने आपले वाहन हवेच्या वेगात पळविले. ख-या पोलिसांचे वाहन हे, आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून दोन तोतया पोलिसांनी आपल्या दुचाकीवर पळ काढला. तर एकांनी अंधाराचा फायदा घेत जवळच असलेल्या उसाच्या शेतात पळ काढला पण पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करुन पकडून बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तर यातील दोघांचा शोध घेणे चालू आहे. बाळू उत्तमराव बलांडे यांच्या फिर्यादीवरुन राजू गंगाधर राठोड, सोनू विनायक जाधव, माधव गणपत देवमारे रा.सर्व बावलगाव ता. औराद, जिल्हा बिदर (कर्नाटक राज्य ) यांच्यावर मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास माधव मरगेवाड करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT