file photo
file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी- डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाय योजना हाती घेतल्या असून आता नांदेड जिल्ह्यातील यवतमाळ सिमेवर तपासणी छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेऊन नागरिकांना जिथल्या तिथे सुरक्षित राहता येईल व त्यांच्यावर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे जाईल. या उद्देशाने ही छावणी प्रवाशांच्या वाहतुकीवरील नियंत्रणासह लोकांना समुपदेशनाचेही काम करेल. पोलिसांच्या या छावणीत कोरोना चाचणी करता यावी यासाठी एक वैद्यकिय पथक राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

मी जबाबदार ठरु नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी

“माझे कुटूंब माझी जबाबदारी” समवेत आता नागरिकांनी यापुढे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मी जबाबदार ठरु नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले होते. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही आज फेसबुकला ईव्हद्वारे संवाद साधून जिल्हावासियांना काळजी घेण्यासमवेत प्रत्येकाने जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा

प्रत्येक नागरिकांनी जर काळजी घेऊन अनावश्यक प्रवास व घराबाहेर पडण्याचे टाळले तर निश्चितच आपण सर्व मिळून कोरोनाच्या या प्रादुर्भावाला रोखू असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जनतेने प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देवून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट करुन नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची उद्या सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT