cement road Sakal
नांदेड

सिमेंट रस्त्यांमुळे अपघाताला निमंत्रण

नियोजनाचा अभाव, प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे दर्जाही निकृष्ट

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - लाखो रुपये खर्च करून शहरांसह गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. परंतु, रस्ते दिसण्यास जरी सुंदर असले तरी ते योग्य नियोजनाअभावी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

आपले गाव, शहर सुंदर दिसण्यात रस्ते व नाल्याचे बांधकाम यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या गावातील रस्ते पक्के असावे असे प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असणे साहजिकच आहे. नागरिकांच्या या अपेक्षेला मूर्तरूप देण्यासाठी खेडोपाडी, गावागावात विविध प्रकारच्या निधीतून सिमेंट रस्ते बांधण्याचा सपाटा सुरु आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार कंत्राटदार या रस्त्याचे बांधकाम करू लागले. त्यामुळे अंदाजपत्रकातील लांबी, रुंदी आणि उंची नुसार रस्ते तयार झाले.

परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्याची रुंदी मात्र कुणीच लक्षात घेताना दिसत नाही. त्यामुळे मध्यभागी सिमेंट रस्ता आणि दोन्ही बाजूला ९० अंशांच्या कोनामध्ये असलेले सुमारे अर्धा फूट खोल खड्डे अशीच काहीसे चित्र बहुतेक गाव खेड्यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला गेले की अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याचबरोबर पायदळ चालताना अनावधानाने बालक, वृद्ध एवढेच नव्हे तर तरुणांना देखील या रस्त्याने आपला हिसका दाखवला आहे.

दुरुस्ती व व्यवस्थापन खर्च मुळातच कमी लागत असल्यामुळे सिमेंट रस्त्यांना प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिक प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. सिमेंट रस्ता उंच झाल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये मुरुम भरण्याचे सौजन्य मात्र कोणी दाखवत नाही किंवा संपूर्ण रस्त्यांचे सिमेंटीकरण करीत नाही. ते वापरणाऱ्यांच्या गैरसोयीचे ठरू नयेत, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

रस्त्याची अवस्था बिकटच

सिमेंट रस्त्यांमुळे ग्रामीण भागात देखील उष्णतेत वाढ झाली आहे. जमिनीत पाणी मुरत नसल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. रस्ते व्यवस्थित बांधले नसल्यामुळे पावसाळ्यात त्याची घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक ठिकाणी कामे निकृष्ट झाल्याचे नागरिक सांगतात. एकूणच सिमेंट रस्त्याची अवस्था विविध ठिकाणी बिकटच असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT