File Photo 
नांदेड

नांदेडच्या ‘त्या’ बँकेतील कर्मचाऱ्यांवर क्वॉरंटाइन होण्याची वेळ 

शिवचरण वावळे

नांदेड : बुधवारी (ता.दहा) दिवसभरात दहा नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले; तर दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत ७९ स्वॅब नमुन्यांची तपासणी सुरू होती. गुरुवारी (ता.११) सकाळी काही स्वॅब अहवाल प्राप्त झाले. त्यात पुन्हा पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०८ इतकी झाली आहे.
 
गुरुवारी प्राप्त झालेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये महावीर चौकातील (कंटेन्मेंट झोन) परिसरातील एका सहकारी बँकेतील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे या बॅंकेतील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट झाली असून, जवळपास ७० कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.  

बँकेचे निर्जुंतिकीकरण करण्याचे काम सुरू

एकाच वेळी एखाद्या बँकेतील इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘त्या’ बँकेचे निर्जुंतिकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. ही बँक गुरुद्वारा परिसराला लागुन असल्याने यापूर्वीच बँकेच्या आजुबाजुचा परिसर सील करण्यात आला आहे. तरीदेखील व्यवस्थापनाने बॅंकेचा व्यवहार सुरुच ठेवला होता. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.  

बॅंकेचा कारभार नित्याप्रमाणे सुरु होता 

राज्य शासनाने लॉकडाउन शिथिल केले असले तरी, ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन येत आहेत, त्या भागात काही नियम व अटी घालुन दिल्या आहेत. परंतु, बहुतेक ठिकाणी शासनाच्या या नियमांची पायमल्ली होत आहे. कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची पुरेशी खबरदारी न घेता या बॅंकेचा कारभार नित्याप्रमाणे सुरु होता. परिणामी बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना आज क्वॉरंटाइन होण्याची वेळ आल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर मनातील खदखद ‘सकाळ’कडे व्यक्त केली.  

जिल्ह्यात वाढणारी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही काही प्रशासनासाठी चिंतेचा विषय नाही; तर नागरिकांनीदेखील जागृक नागरिक म्हणून जबाबदारीने वागले पाहिजे. अन्यथा नांदेडचा हा आकडा असाच वाढत राहिल्यास नवल वाटणार नाही. त्यामुळे सर्वांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.    
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT