file photo 
नांदेड

इतवारा पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक; आज करणार न्यायालयासमोर हजर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : खुनाचा प्रयत्न, दंगल आणि भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन करुन परिसरात दहशतीसारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या चार जणांना इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शहराच्या विविध भागातून मंगळवारी (ता. २३) रात्री अटक केली आहे. त्यांना बुधवारी (ता. २४) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ता. चार सप्टेंबर २०२० रोजी शहजाद उर्फ मोहम्मद शकीलोउद्दीन (वय २७) राहणार उमर कॉलनी या व्यापाऱ्यास रस्त्यात अडवून पोलिस को हमारे खिलाप रिपोर्ट देता क्या या कारणावरुन प्राणघातक हल्ला केला होता. तलवार आणि खंजरने त्याच्यावर सपासप वार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करुन परिसरात दहशत माजवली होती. याप्रकरणी ईतवारा पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी जवळपास सात महिन्यांपासून फरार होते.

पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी इतवारा पोलिसांचे कान टोचताच खडबडून जागे झालेल्या इतवारा गुन्हे शोध पथकाने रात्रीची गस्त सुरु केली. गुप्त माहितीवरुन पोलिस फौजदार दत्तात्रय काळे यांनी आपल्या पथकासह मोहम्मद इब्राहिम मोहम्मद बाबू (वय ३७), शेख वसीम उर्फ यील्लू शेख शौकत (वय २६) आणि शेख मुसा शेख शौकत (वय २४) सर्व राहणार उमर कॉलनी नांदेड यांना मंगळवारी (ता. २३) मार्च रोजी रात्री अटक केली.

त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणात खुनाचा व दंगलीचा गुन्हा दाखल असलेला अब्दुल हमीद उर्फ सदाम अब्दुल माजिद (वय ३२) राहणार करबला रोड, सिद्धार्थनगर नांदेड यालाही अटक केली. या सर्वांना सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मुत्यपोड बुधवारी (ता. २४) न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी सांगितले. एकाच रात्री गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्याची कारवाई इतवारा पोलिसांनी केल्याने पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर भोरे यांनी कौतुक केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Sangli Fake IT Raid Case: 'स्पेशल 26' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरच्या घरावर आयकर छापा, सोने व रोकड लंपास | Sakal News

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

SCROLL FOR NEXT