येलदरी sakal
नांदेड

जिंतूर : ‘येलदरी’तून साडेनऊ कोटींची वीजनिर्मिती

५८ दिवसांतील कामगिरी, तीन कोटींपेक्षा अधिक युनिट वीज

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणालगतच्या जलविद्युत केंद्राद्वारे गेल्या ५८ दिवसांत तब्बल नऊ कोटी ५६ लाख १३ हजार रुपयांची तीन कोटी आठ लाख ६९ हजार युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. सध्या विजेचा तुटवडा जाणवत असताना जलविद्युत केंद्राची ही कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून सिंचन, वीज निर्मितीच्या उद्देशाने येलदरी येथे पूर्णा नदीवर ९३४.४४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेचे धरण १९६८ मध्ये उभारले गेले. लगतच जलविद्युत प्रकल्प १९६९ मध्ये कार्यान्वित करण्यात आला. येथे तीन संचाद्वारे २२.५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. यावर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात धरणाच्या लाभक्षेत्रात अति पाऊस झाला. त्यामुळे येलदरी धरण पूर्ण भरले. सातत्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला. शिवाय ऊर्ध्व भागातील खडकपूर्णा धरण तुडुंब झाल्याने अतिरिक्त पाणी येलदरीत येत होते.

अतिरिक्त पाण्यावर सात सप्टेंबरला मध्यरात्री केंद्रातील तिन्ही संच सुरू करण्यात आले. ते तीन नोव्हेंबरला बंद करण्यात आले. ५८ दिवस अखंडितपणे संच कार्यान्वित होते. त्यातून ३ कोटी ८ लाख ६९ हजार युनिट वीजनिर्मिती झाली. महावितरण कंपनीला ९ कोटी ५६ लाख १३ हजार रुपये उत्पन्न मिळाले. वीजनिर्मितीत व्यत्यय येऊ नये यासाठी कार्यकारी अभियंता बी.एम.डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यु.एस.पाटील, उप कार्यकारी अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली.

एका दिवसातील उच्चांक

येलदरीतील प्रकल्पातून सात ऑक्टोबर या एकाच दिवशी विक्रमी म्हणजे पाच लाख ५२ हजार युनिट वीजनिर्मिती झाली. दिवसभरातील कामगिरीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT