sanitary napkins sakal
नांदेड

अवघ्या पाच रुपयांत मिळणार सॅनिटरी नॅपकीन

सगरोळीच्या अध्यापिकेने तयार केले स्वयंचलित यंत्र

सकाळ वृत्तसेवा

सगरोळी : मुलींना शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब ठेवण्याच्या वेगवेगळ्या कारणांमध्ये मासिकपाळी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता सहज झाल्यास त्याचा उपयोग होऊन मुलींना शिक्षणात व्यत्यय येणार नाही हे लक्षात घेऊन सगरोळी (ता.बिलोली) येथील छत्रपती शिवाजी उच्च मध्याविक विद्यालयाच्या अध्यापिका किरण सलगर यांनी प्रायोगिक तत्वावर एटीएम मशीनसारखे सॅनिटरी नॅपकीन मशीनची निर्मिती केली आहे. या मशीनमध्ये पाच रुपयाचे कॉईन टाकून बटन दाबताच मशीनमधून एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येते.

ग्रामीण भागात मासिकपाळी याविषयी अनेक अंधश्रद्धा देखील आहेत. त्यामुळे या कालावाधीमध्ये मुली शाळेपासून दुरावतात. त्याचा अभ्यासावर विपरीत परिणाम होतो तर काही मुलींची शाळाही कायमची दुरावली जाते.

मुलींना शाळेतच स्वच्छतेच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून जागृती केल्यास मुलींमधील भीती दुरावून आरोग्य अबाधित राहण्यास मदत होते. यासाठी येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेने प्रशालेत मुलींसाठी अद्ययावत स्वच्छतागृह व चेंजिंग रूमची व्यवस्था करून दिली आहे. फक्त गरज होती ती सॅनिटरी नॅपकीन सहज उपलब्ध होण्याची, ती गरजही येथील अध्यापिका किरण सलगर यांनी पूर्ण केली.

सध्या प्रायोगिक तत्वावर कागदी पुठ्ठयांपासून छोट्याश्या मशीनची निर्मिती केली आहे. हे मशीन जवळपास एटीएम मशीनसारखेच असून पाच रुपयाचा बंदा टाकून बटन दाबताच एक सॅनिटरी नॅपकीन बाहेर येते. या मशीनमध्ये अनेक सॅनिटरी नॅपकीन ठेवता येतात.

शाळेत व घरी वापरण्यासाठी मुली आवश्यकतेनुसार या मशीनमधून नॅपकीन घेऊ शकतील. इंटरनेटवरून त्यांनी अनेक मशीनचा अभ्यास करून याची निर्मिती केली आहे. प्लायवूड व इतर धातूंपासून मोठ्या मशीनची निर्मिती केली जाणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. आपल्या विद्यालयातील किशोरवयीन मुलींची गरज ओळखून या मशीनची निर्मिती केल्याबद्दल किरण सलगर यांचे संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख व सचिव डॉ. जयंत जकाते यांनी कौतुक केले आहे.

''प्रशालेत मुलींची संख्या जास्त असून, सॅनिटरी नॅपकीन अल्पदरात सहज उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने मला ही कल्पना सुचली व मुलींच्या सहकार्यानेच या मशीनची निर्मिती केली. प्रशालेत नित्य वापरण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून मोठ्या मशीनची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ह्या मशीनसाठी विजेची आवश्यकता नाही.''

- किरण सलगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

SCROLL FOR NEXT