file photo 
नांदेड

‘न्याय आपल्या दारी ’:नांदेड जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालय यांच्या ‘न्याय आपल्या दारी’या संकल्पनेतून सुरु केलेल्या फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातीत निवडक तालुक्यांच्या निवडक गावांमध्ये ता. आठ फेब्रुवारी ते ता. २३ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे.


ता. आठ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या हस्ते फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबीरासाठी उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथुन आलेल्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

ता. आठ फेब्रुवारी ते ता. २३ फेब्रुवारी या कालावधीत सदर फिरते लोकअदालत हे जिल्ह्यातील निवडक तालुक्यातील नियोजीत गावात फिरुन न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच बॅंकांचे, विमाकंपनी, विद्युत महामंडळ, बीएसएनएल व इतर दिवाणी दाखलपुर्व प्रकरणे सदर लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराव्दारे जनजागृती केली जाणार आहे. तसेच सदर लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून सेवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश कमल वडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
         
प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप आणि जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी सदरील फिरते लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सदरील गावातील लोकांनी सहकार्य करावे व जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन केले आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

IPL 2026: विराट-धोनी आमने सामने येणार नाहीतच! MS Dhoni च्या खेळण्याबाबत नवी अपडेट समोर

Nagpur Bhosale Descendants : शिवरायांशी नागपूरच्या भोसले घराण्याचे नाते काय? नव्या पिढीचे वंशज आता काय करतात? पाहा वीरांचा वारस

Aniket Verma Inspirational Jounery : ३ वर्षांचा असताना आईचे निधन; वडिलांचे दुसरे लग्न... हार्दिक पांड्याची 'मॅगी' स्टोरी अन्...

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

SCROLL FOR NEXT