Accident Sakal
नांदेड

Accident News: भरधाव कार दुभाजकावर आदळून अपघातात दांपत्य ठार

भरधाव कार दुभाजकावर आदळून दांपत्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी - भरधाव कार दुभाजकावर आदळून दांपत्याचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाला. शहरालगतच्या वळण रस्त्यावर रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी प्रा. जयप्रकाश कावरखे (वय ६५) हे पत्नी मंजूषा जयप्रकाश कावरखे (६०) आणि मुलगा पराग कावरखे (२८) यांच्यासह कारने (एमएच ३८ व्ही ०६५१) रविवारी सकाळी नांदेडहून हिंगोलीकडे येत होते. पराग कार चालवत होता.

कळमनुरी शहराजवळच्या वळण रस्त्यावरून परागचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. यात कावरखे दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन कारमध्ये अडकलेल्या परागला बाहेर काढण्यास मदत केली.

पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक शेख उमर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परागवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. जयप्रकाश हे महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पत्नी मंजूषा याही शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT