nanded sakal
नांदेड

Nanded News : दक्षिण भारतात प्रसिद्ध माळेगावची खंडोबाची यात्रा; देवस्वारीसह पालखी पूजनाने होणार सुरुवात

या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात आदी राज्यातून भाविकांसह व्यापारी दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिध्‍द असलेल्‍या श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाच्‍या यात्रेला बुधवारपासून (ता. दहा) सुरूवात होणार आहे. या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात आदी राज्यातून भाविकांसह व्यापारी दाखल झाले आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेची सुरूवात बुधवारी देवस्वारी व पालखी पूजनाने होणार आहे. यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने विविध स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, बचत गटाचे वस्तू प्रदर्शन, कुस्ती स्पर्धा, लावणी व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजन होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे आदींची उपस्थिती राहणार आहे.

बुधवारी दुपारी तीन वाजता महिला व बालकांसाठी स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेचे उद्‍घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यंदा यात्रेत सीसीटीव्ही बसवणे, प्लास्टिक मुक्त यात्रा करणे, सेंट्रल अॅड्रेस सिस्टीम बसवणे, रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छतागृह याकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. त्याचबरोबर मोबाईलवरही ॲपच्या माध्यमातून सुविधा देण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासकांच्या नियोजनात होणारी ही दुसरी यात्रा आहे. सरपंच कमलबाई धुळगुंडे, बालाजी नंदाने, हणमंत धुळगुंडे, संभाजी धुळगुंडे यांनी समन्वय ठेऊन नियोजन केले आहे. पाणीपुरवठ्याचा विषय यात्रा सुरु होईपर्यंत असायचा, पण यावर्षी तो यात्रेपुर्वीच सोडवला गेला आहे.

कृषी प्रदर्शन, कृषीनिष्‍ठ शेतकऱ्यांचा सत्‍कार

यात्रेत बुधवारी सायंकाळी चार वाजता जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागातर्फे आयोजित कृषी प्रदर्शन उद्‍घाटन होईल तसेच कृषीनिष्‍ठ शेतकऱ्यांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती राहील.

विविध माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

माळेगाव यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी http://malegaonyatra.ceozpnanded.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. यामध्ये माळेगाव यात्रेत देण्यात आलेल्या सुविधा, नागरिकांनी माळेगावात कसे यावे, आपत्कालीन संपर्क क्रमांक, संपूर्ण माळेगाव यात्रेचा नकाशा, माळेगाव यात्रेतील कार्यक्रम, यात्रेची परंपरा व इतिहासाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT