NND16KJP01.jpg 
नांदेड

खरीप पेरणीला झाली सुरवात.....कुठे ते वाचा 

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात मागील चार - पाच दिवसापासून मोसमी पावसाचे आगमन समाधानकारक हजेरी आवल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला आहे. प्रारंभी पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी हळद तसेच कपाशीची लागवड सुरू केली होती. त्यानंतरही पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग यासह इतर खरीप पिकांची पेरणी सुरू केली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७ मिलीमीटरनुसार वार्षीक सरासरीच्या १०.९५ टक्के पावसाची नोंद झाली. कृषी विभागानेही जिल्ह्यात खरीप पेरणी सुरू झाल्याची माहिती दिली.

सलग पावसामुळे पेरणीला प्रारंभ
जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. हा पाऊस जिल्ह्यातील सर्व तालुक्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला प्रारंभ केला. यामध्ये सुरुवातीला ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस तसेच हळद लागवडीला प्रारंभ केला. यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, तूर, उडीद, मूग या पिकांच्या पेरणीला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. १५) सर्वच तालुक्यात पाऊस झाला. मंगळवारी (ता. १६) सकाळी सरासरी १६.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या १०.९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

आठ लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज
जिल्ह्यामध्ये सात लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. यात चार लाख हेक्‍टरवर सोयाबीन तर दोन लाख हेक्‍टरवर कापूस लागवड होईल असा अंदाज आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी खते, बियाणे खरेदी करून पेरणीपूर्व कामे आटोपली होती. यानंतर मागील आठवड्यात पावसाने पहिल्या सलग हजेरी लावल्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. मोसमी पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक झालेला दिसून येत आहे. 

तालुकानिहाय झालेला पाऊस
(पाऊस मिलीमीटरमध्ये) 
नांदेड ३१.२५, मुदखेड व अर्धापूर प्रत्येकी १५, भोकर १६, उमरी २७, कंधार ११.६७, लोहा २७.३३, किनवट १७.५७, माहूर २५.२५, हदगाव ९.७१, हिमायतनगर आठ, देगलूर ५.६७, बिलोली १०.२०, धर्माबाद १८.६७, नायगाव ११.२०, मुखेड १७.७१ मिलिमीटर पाऊस झाला.

काही मंडळात जोरदार पाऊस 
लोहा तालुक्यातील कलंबर मंडळात सर्वाधिक ६३, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तुप्पा मंडळांमध्ये ५२, मिलिमीटर पाऊस झाला. धर्माबाद ३२, मांडवी ४२, दहेली ४६, उमरी ४१, सिंधी २५, देगलूर २३, जांब २५, जाहूर २४, नांदेड शहर २९, विष्णुपुरी २१, वसरणी ३०, नांदेड ग्रामीण २७, वजीराबाद २५, लिंबगाव ३८, धर्माबाद ३२ मिलीमीटर पाऊस झाला.

सर्वच पिकांची पेरणी सुरु
पेरणी योग्य पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्वच पिकांची पेरणी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी कमी पाऊस, आहे अशा ठिकाणी एखादा पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरु करावी.
- रविशंकर चलवदे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Police Bribery : लाचखोर पोलिसाला एसपी दोशींचा मोठा दणका; न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी मागितलेली 5 हजारांची लाच, हवालदाराला कसं रंगेहाथ पकडलं?

CSK: चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 च्या प्ले ऑफमध्ये का नाही पोहोचली? दिग्गज खेळाडूने सांगितली ४ मोठ कारणं

Pune Crime News : "साहेब आम्हाला गोळ्या घाला पण मुलगी शोधून द्या!" पुण्यात पालकांचा पोलीस स्टेशनसमोर आक्रोश, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : गोळीबार प्रकरणी आंदेकर टोळीतील पाचजणांना २७ मेपर्यंत पोलिस कोठडी

Ganga River: गंगेच्या अखेरच्या टप्प्यात प्रदूषणात मोठी घट; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे सुधारणा, बहुतांश भाग आता स्नानासाठी योग्य

SCROLL FOR NEXT