नांदेड : नांदेड रेल्वे विभागाच्या नगरसूल स्थानकातून सोमवारी पश्चिम बंगालला रवाना झालेली तीनशेवी किसान रेल्वे. सकाळ
नांदेड

नांदेडमधून किसान रेल्वे सुसाट! मिळाला ४२ कोटींचा महसूल

प्रमोद चौधरी

नांदेड : नांदेड रेल्वे विभागाच्या (Nanded Railway Division) नगरसूल येथून तीनशेवी किसान रेल्वे (Kisan Railway) २४६ टन कांदा घेऊन पश्चिम बंगाल येथील मालडा टाऊन येथे सोमवारी (ता.नऊ) रवाना झाली. वाहतूक दरात ५० टक्के सूट दिली जात असल्याने शेतीमालाच्या रेल्वे वाहतुकीत वाढ झाली आहे. नांदेड रेल्वे विभागातून पाच जानेवारी २०२१ ला सुरु केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. फक्त २१६ दिवसांत किसान रेल्वेच्या तीनशे खेपांनी नगरसूल येथून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्षे आणि टरबूज पोचविला आहे. या किसान रेल्वेद्वारे नांदेड (Nanded) विभागास ४२ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. किसान रेल्वेने शेतमाल वाहतूक केल्यास दरात ५० टक्के सूट देण्यात येत आहे. अनेक शेतकरी, व्यापारी या योजनेचा फायदा घेत असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

विविध भागात गेला शेतमाल

एक जानेवारी ते नऊ ऑगस्ट दरम्यान नगरसूल येथून किसान रेल्वेच्या तीनशे खेपांतून ९१ हजार ६६५ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. हा शेतीमाल नवी दिल्ली, गुवाहाटी, मालडा टाऊन, आगरतळा, फातुहा, न्यू जलपैगुडी आदी ठिकाणी पोचविण्यात आला आहे.

कृषी क्षेत्राला मिळाली चालना

कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगसाठी अडचणीमुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल्वे चालवण्याची संकल्पना केंद्र सरकारने राबवली आहे. किसान रेल्वेचे वैशिष्ट म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किलोमीटर प्रती तास वेगाने धावतात. त्यामुळे शेतीमाल वेळेवर पोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स - टॉप टू टोटल’च्या अंतर्गत किसान रेल्वे गाड्यांद्वारे अधिसूचित फळे, भाजीपाल्याच्या वाहतुकीवर पन्नास टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT