cash.jpg 
नांदेड

या विभागाने केला सात लाखांचा दंड वसूल; जाणून घ्या

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि.नांदेड) : अवैध गौण खनिज वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांनी अवैध वाळू, मुरूम वाहतूक होत असलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार विशेष भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली. अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी धर्माबाद तालुक्यात दहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.


माफियांच्या मुसक्या सूचना 
(ता. एक) एप्रिल ते (ता.चार) जून या दोन महिन्यांच्या काळात सहा वाहनांकडून एकूण सात लाख २८ हजार ६२८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अजून चार वाहनांनी दंड भरणे बाकी आहे. यामुळे अवैध गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहेत. धर्माबाद तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून व संगम नदीपात्रातून रात्रंदिवस होत असलेल्या वाळूच्या अवैध उत्खननाबरोबरच तालुक्यात मुरूम गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. गौण खनिजाची लूट करणारी टोळी बिनधास्तपणे मुरूम खोदून त्याची वाहूतक मोठ्या प्रमाणावर करीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील गौण खनिज रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनानुसार कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांनी अवैध गौण खनिज माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांना सूचना दिल्या. 


वाहतूक करणारे जुमानत नसल्याचे चित्र
त्यानुसार तहसीलदार शिंदे यांनी विशेष भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी धर्माबाद तालुक्यात टिप्पर, ट्रॅक्टर अशा दहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. (ता. एक) एप्रिल ते (ता. चार) जून या दोन महिन्यांच्या काळात सहा वाहनांकडून एकूण सात लाख २८ हजार ६२८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर अजून चार वाहनांनी दंड भरणे बाकी आहे. सदरील वाहनांवरील कारवाई तहसीलदार दत्तात्रय शिंदे, मंडळ अधिकारी एन. एस. माळोदे, गरुडकर, पवळे, तलाठी लक्ष्मीकांत आंबेराय, सहदेव बासरे, बी. जी. कदम, सचिन उपरे, एस. बी. विसपुते, ए. एस. देवापुरे आदींनी केली आहे. अवैध गौण खनिजप्रकरणी कारवाई होत असली तरी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे जुमानत नसल्याचे चित्र कारवाईवरून दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

VIDEO : कोल्हापुरात 'व्हॅलेंटाईन डे'ला अघोरी कृत्य; हळद-कुंकू लावून झाडाला तरुणीचा फोटो अन् काळी बाहुली खिळ्याने ठोकली, भानामती की बदनामीचा कट?

Malegaon News : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार?; संचालक मंडळाची एकमुखी सहमती

Latest Marathi News Live Update : पुढील तीन ते चार दिवस शरद पवार घरीच आराम करणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT