varsha thakur. 
नांदेड

क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या विचारांचा जागर जिल्हा परिषदेद्वारे सदैव करण्याचा निर्धार- वर्षा ठाकूर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महिलांकडे माणुस म्हणून बघण्याची, तिला शिक्षणाचा प्रवाहात आणून सन्माने उभे करण्याची, तिला सन्माने जगण्याच्या हक्काची जाणीव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी करुन दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांसाठी असलेल्या बंदिस्त जोखडातून मुक्त करण्याचे काम अत्यंत जिद्दीने सावित्रीबाईंनी केले. हे कार्य करतांना समाजातील ठराविक वर्गाकडून आलेल्या शेणामातीचे गोळेही तिने अंगावर घेतले. महिलांना स्वाभिमानी व शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही केवळ एक दिवसापूरती साजरी करुन चालणार नाही तर तिने दिलेल्या शिकविणीचे बळ व विचाराचा जागर सदैव करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.

सुट्टीचा दिवस असूनही जिल्हा परिषदेतील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात एकत्र येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विचारा- विचारांचा जागर करीत वेगळ्या पद्धतीने साजरी केली. जिल्हा परिषदेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या प्रातिनिधीक शाळांतील मुलींना आपल्या भावभावना व सवित्रीबाईंबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी यशस्वी वेबनारचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद साधला. 

विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये व्याख्यान, चर्चासत्र, भाषण, निबंध लेखन, वक्तृत्व, परिसंवाद, एकांकिका, वेबीनार इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील महिला शिक्षिका, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पालक, विद्यार्थी यांनी वेबिनार मध्ये सहभाग घेतला. नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी व माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानोळा या शाळेतील मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनपटावर आधारीत अतिउत्कृष्ट एकांकीका सादर केल्या. यातून महिलांचा व मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: तुमचा EMI वाढणार? SBI च्या अहवालाने चिंता वाढवली; डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढल्यास किती वाढणार EMI?

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! चिप्स, बिस्किटांसह खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर दिसणार 'हा' इशारा

IND vs NZ, 2nd Test: 'गुरनूरच्या पदार्पणासाठी रस्ते मोकळे, सिराजने वेग परत मिळवावा!', आर अश्विनने टीम इंडियाचा प्लॅन जगाला सांगितला

भिवंडीत नाला साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; महापालिका आयुक्तांच्या बंगल्याजवळ दुर्घटना

Latest Marathi News Live Update: नागपुरात कॉकरोज जनता पार्टीची संविधान बचाव रॅली

SCROLL FOR NEXT