file photo 
नांदेड

कुष्णूर धान्य घोटाळा प्रकरण : कपील पोकर्णासह तिघांची कारागृहात रवानगी 

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड) : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या कुष्णूर धान्य घोटाळ्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ता. २१ रोजी पकडलेल्या तिघांना नायगावचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी डब्ल्यू. ए. सय्यद यांनी गुरुवारी (ता. २४) न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. सदर प्रकरणी आरोपींच्या जामीनावर बुधवारी युक्तिवाद होणार आहे. 

दोन वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये कुष्णूर धान्य घोटाळा उघडकीस आला. नायगाव तालुक्यातील कुष्णूर येथील इंडिया मेगा अँग्रो अनाज कंपणीत बेकायदेशीररित्या धान्य पुरवल्या जात असतांना तेथे पोलिसांनी छापा टाकला व ११ धान्याचे ट्रक पकडले. धान्य घोटाळ्यातील व्याप्तीने हा बहुचर्चीत घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला. या प्रकरणात शासकीय गोदामपाल, वाहतूक कंत्राटदार, अव्वल कारकून, लिपीक, ट्रक ड्रायव्हरसह बड्या व्यापाऱ्यांना अटक झाली होती. 

या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींची जामीनावर सुटका झाल्यानंतर प्रकरण थंड बस्त्यात गेल्यात जमा असतांना दोन आडीच वर्षानंतर या प्रकरणात नांदेड येथील कपील पोकर्णा यांच्यासह दयानंद आहिर आणि पांडुरंग राठोड यांना ता. २१ रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या तिघांनाही नायगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यांना दोन वेळा एक एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. 

दोन दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा आज तिघांनाही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे व त्यांच्या पथकाने नायगाव न्यायालयात गुरुवारी (ता. २४) हजर केले होते. यावेळी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी डब्ल्यू. ए. सय्यद यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपींच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र यावर बुधवारी निर्णय होणार आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT