पिक 
नांदेड

पावसाच्या दडीमुळे पिकांवर वरवंटा, शेतकऱ्यांच्या आशा धुळीस

प्रमोद चौधरी

नांदेड : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे (Rain) आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असला तरीही पावसाची दडी खरीप पिकाच्या (Kharip Crops) उत्पन्न वाढीवर वरवंटा फिरवून गेली आहे. मूग, उडीद व सोयाबीन ही पिके ऐन फुलावस्थेत तर मका कणीस फेकण्याच्या अवस्थेत असताना पाऊस गायब झाला. मध्यंतरी गुलाबी बोंडअळीने धुमाकुळ घातल्याने यंदा शेतकऱ्यांनी (Farmer) आपला मोर्चा सोयाबीन, मका, उडीद व मूग पिकाकडे वळवला. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने यावर्षी (Nanded) ही शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. सध्या दोन ते तीन दिवसांपूर्वी बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. मात्र, पाऊस उघडीपी नंतर आता कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी तर सोयाबीन व मक्यावरही अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी फवारून ही पिके जगवावी लागत आहेत.

१५ ते २० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाले असले तरी हा पाऊस जमिनीतून बाहेर निघाला नसल्याने नदी नाले अद्यापही कोरडे आहेत. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्याने विहीरींनीही तळ गाठले असून यापुढे दमदार पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

औषधी घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

सध्या कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच सोयाबीन व इतर पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे औषधी घेण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या कीटकनाशक कंपन्याही आमचेच औषध कसे चांगले आहे. याचे प्रात्यक्षिक देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे साहजिकच शेतीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता असून, कीटकनाशकांचे वेगवेगळे दर वेगवेगळ्या दुकानावर दिले जात असल्याचे पाहावयास मिळत आहेत.

मागील आठवड्यात १५ दिवसांच्या दडीनंतर पाऊस न झाल्याने खरिपाच्या पिकाला जीवदान मिळाले. परंतु हाच पाऊस १५-२० दिवसांपूर्वी पडला असता तर अनेक खरिपाची पिके हातची गेली नसती. सध्या सोयाबीन, उडीद व मूग तसेच मका पिके उत्पन्नवाढीतून बाद झाली आहेत. देर आयी... दुरुस्त आयी या उक्तीप्रमाणे हा पाऊस पडला असून यापुढेही नदी, नाले भरून वाहतील, असा पाऊस अजूनही अपेक्षित आहे. तरच रब्बीच्या पिकाला त्याचा फायदा होईल.

- काकासाहेब शेरकर पाटील, शेतकरी.

हवामानातील बदलामुळे सद्यःस्थितीत मूग, उडीद व सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीतज्ज्ञांचा सल्ला घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करणे आवश्यक आहे.

- डॉ. देवीकांत देशमुख, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT